शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सीईओंची प्रकाशा बॅरेजला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  प्रकाशा, ता.शहादा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी भेट देऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  प्रकाशा, ता.शहादा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी भेट देऊन बॅरेज प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत विभागाचीदेखील माहिती जाणून घेत अधिका:यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळसदृश्य स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करावे यासाठी ही भेट दिल्याचे सांगण्यात आले.याबाबत वृत्त असे की, चिपळूण  तालुक्यात झालेल्या धरण फुटीनंतर प्रकाशा बॅरेजच्या पाहणीसाठी अधिका:यांच्या भेटी वाढल्या आहेत. धुळे येथील कार्यकारी अभियंता एस.जी. शहापुरे यांनी प्रकाशा बॅरेजला भेटी देऊन वरिष्ठांना सूचना दिल्यात.  यानंतर जळगावचे अधीक्षक अभियंता एस.जी. वंजारी यांनी पाहणी करून सर्व अधिका:यांना धारेवर धरत मुख्यालयी राहण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, शुक्रवारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बॅरेजला भेट देत पाहणी केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी टी.टी. गोसावी, बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुरे, बॅरेजचे सहाय्यक अभियंता वरूण जाधव, पियुष पाटील, जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, अरुण वरसाळे, दिलीप पाटील, नंदकिशोर पटेल, गजानन भोई, रामबाबा पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी गावाची पाहणी करीत मुख्य कार्यकारी अधिका:यांनी बॅरेजची पाहणी केली. पाण्याची लेव्हल काय आहे ते जाणून घेतले. यानंतर त्यांनी एका गेटजवळ उभे राहून गेट ऑपरेट करण्यास सांगितले. गेट वर घेण्यापूर्वी हॉर्न वाजवला जातो का याची खात्री केली. त्याचप्रमाणे गेट खाली-वर करताना काही अडचणी आहेत का हे ही प्रत्यक्ष पाहिले. बॅरेजवर स्थापत्य विभागाचे वरूण जाधव, सुनील भिल यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. या वेळी यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅरेजचे गेट वर-खाली करताना अडचण येऊ नये यासाठी लवकरच ग्रीसिंग व ऑईलिंगचे काम करण्याच्या सूचना देत पावसाळा सुरू असेर्पयत गेट वर करून कामाला लागावे. हे करताना शेतक:यांनाही विश्वासात घेऊन काम करावे आणि पावसाळा संपण्याच्या अगोदर गेट डाऊन करून पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, असे सांगितले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, हातचे पाणी वाया जावू नये यासाठी अधिका:यांनी दक्ष राहून योग्य ते  नियोजन करावे, असे सांगितले. या बॅरेजलगतच केदारेश्वर मंदिर  असून मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्यासह मंदिराचे सदस्यांनी बॅरेज परिसरात वृक्ष लागवड केली.