शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेने झळाळतेय जिल्हा परिषदेची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर शासनाचा प्रयत्न आहे़ यातून नंदुरबार जिल्हा परिषद इमारत सौर ऊर्जेने झळाळू लागली असून ५० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प येथे कार्यान्वित झाल्याने हे शक्य झाले आहे़ जिल्ह्यात प्रथमच एखाद्या शासकीय कार्यालयावर अशा प्रकाराची सुविधा निर्माण करुन वीज बचत केली गेली आहे़ प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देत माहिती घेतली़कोळसा, डिझेल, पेट्रोल, गॅस यासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर भविष्यातील त्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे़ पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा होणारा अतिवापर रोखण्यासाठी शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा हा एक स्त्रोत वापरण्यासाठी विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. या स्त्रोताचा वापर केल्यामुळे वीज बिलाची बचत होऊन पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासालाही आळा घालता येणार आहे़ या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रकारच्या प्रशासकीय मंजुरीनंतर जिल्हा परिषद आवारातील वाहनतळाच्या छपरावर ५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाच्या अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर डी. एच. चौधरी, उप अभियंता इंजिनिया बी. के. जगदाळे, कनिष्ठ अभियंता इंजिनियर प्रमोद भदाणे, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे सहप्रमुख किशोर पाटील यांनी प्रकल्पासाठी परिश्रम घेतले़४जिल्हा परिषद इमारतीमधील चार मजल्यात विविध १७ विभागांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची कार्यालये, दोन लहान व एक मोठे सभागृह आणि इतर अधिकाºयांची कार्यालये आहेत़ या सर्व ठिकाणांना दररोज ६०० युनिट तर प्रतिमाह सरासरी दहा हजार युनिट विजेची गरज लागते़ वीजेची ही गरज भागवण्यासाठी ५० किलो वॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करुन दररोज सुमारे २०० युनिट निर्मिती होईल असा हा प्रकल्प आहे़४नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीला एक्सप्रेस फिडरने दोन वषार्पासून वीज पुरवठा केला जातो़ गरज भासल्यास जनरेटरची सोय आहे. परंतू या प्रकल्पामुळे इमारतीत अखंड वीज पुरवठा होणार आहे़ ३८ लाख रुपये खर्च करुन तयार केलेल्या या प्रकल्पामुळे शासनाचा विजेवरचा दर महिन्याचा ५० हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे़ आॅन ग्रीड पद्धतीने बसवलेल्या या सोलर रूफ टॉप सिस्टीममुळे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तयार होणारी अतिरिक्त वीज थेट वीज महामंडळाला पुरविली जाणार आहे. भविष्यात जिल्हा परिषद इमारतीला आवश्यक असलेला संपूर्ण वीजपुरवठा सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी नियोजन केले जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पावर केला गेलेला खर्च दोन ते तीन वर्षात वीज बिलाच्या माध्यमातून वसूल होऊन, जिल्हा परिषद प्रशासनाचा वीज बिलावरील खर्च यापुढे कमी होणार आहे.