शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पबजीचे वेड कमी करण्यासाठी युटय़ूब आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:49 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभर धुमाकूळ घालून पबजी नामक गेम ग्रामीण भारतीय युवकांच्या मोबाईलमध्ये अवतरला ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगभर धुमाकूळ घालून पबजी नामक गेम ग्रामीण भारतीय युवकांच्या मोबाईलमध्ये अवतरला आह़े मेंदूवर ताबा मिळवणा:या गेमची नशा काहीशी कमी व्हावी म्हणून नंदुरबारातील चौघांनी मिळून यूटय़ूबसाठी व्हीडिओ तयार करुन वेगळा प्रयत्न करुन पाहिला आह़े   नंदुरबार शहरातील जयेश पाठक, यश पवार, आसिफ खाटीक आणि कामिनी भोपे या चौघांनी मिळून दोन आठवडय़ापूर्वी पब्जीचे दुष्परीणाम दर्शवणा:या व्हिडिओ शूट करण्याचा विचार केला होता़ मग त्यावर चर्चा आणि संकल्पनेची बांधणी करत काम केल़े जयेश पाठक याने दिग्दर्शन, यश पवार याने डिजीटल कॅमे:याने व्हिडिओ, कामिनी भोपे हिने संवाद आणि इतर बाबी सांभाळल्या़ आसिफ खाटीक याने त्यात अभिनय केला़ नंदुरबार शहरातील नव्याने तयार झालेल्या एका चक्री मार्गाची निवड करत त्याठिकाणी अवघ्या अध्र्या तासा व्हिडिओ शूट करुन त्याचा एडीटिंग केलं़ याबाबत दिग्दर्शन करणा:या जयेश पाठक याला विचारला असता, त्याने सांगितले की, नंदुरबार शहरात असे बरेच मित्र आहेत, ज्यांना गेमिंगचं आभासी जग हे प्रचंड आवडतं़ तासनतास ते केवळ गेम खेळून काढतात़ यातून त्यांच्या मानसिक समस्या समोर आल्या आहेत़ एकलकोंडेपणा वाढून मित्रांसोबत त्यांची ताटातूट झाली आह़े हीच संकल्पना मांडून हा व्हिडिओ तयार केला़ नंदुरबार शहरासारख्या छोटय़ा शहरातील 14 ते 22 वर्षाच्या विद्याथ्र्यामध्ये असलेली गेमिंगची क्रेझ चिंताजनक आह़े यामुळे अभ्यासावर परिणाम होऊन दैनंदिन  व्यावहारिक जीवनापासून ते दुरावत आहेत़  यासाठी अशाप्रकारचे व्हिडिओ सहाय्यकारी ठरत आहेत़