शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेरी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यात पोहोयला गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यात पोहोयला गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मयत युवक हा मित्रांसोबत सुटी घालवण्यासाठी येथे आला होता़  शुभम मनोहर शिंदे (21) रा.भादवड, ता.नंदुरबार असे मयत युवकाचे नाव असून तो रविवारी  शुभम वासुदेव पाटील, अविनाश योगेंद्र गिरासे, दिनेश लक्ष्मण वाघ, कुणाल माळी, कल्पेश भोजू पाटील, कल्पेश माळी रा.सर्व नंदुबार व राहुल आंबालाल चव्हाण रा.निझर यांच्यासोबत वाल्हेरी येथे आला होता़ शुभम हा नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेत होता़ महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणा:या शुभमला रविवारी सुटी असल्यामुळे तो वसतीगृहातीलच मित्रांसोबत वाल्हेरी धबधब्यावर पोहोण्यासाठी आला होता़ शुभव व त्याच्यासोबत असलेले सात जण धबधब्याच्या पाण्यात पोहत असतांना शुभमने धबधब्याच्या खडकावरुन पाण्यात उडी मारली़ दरम्यान पाण्यात पडल्यानंतर पोहता न आल्याने नाकातोंडात पाणी जावून त्याचा मृत्यू झाला़ यावेळी सोबतच्या  मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर वाल्हेरीचे  पोलीस पाटील रवींद्र पाडवी यांच्यासह गावातील युवकांनी पाण्यात उडी घेत शुभमला बाहेर काढले होत़े परंतू बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला़ उपजिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले होते. मयत शुभम याचे आई-वडील आणि नातेवाईकांना घटना कळल्यानंतर त्यांनी तळोद्याकडे धाव घेतली होती़ उपजिल्हा रुग्णालयातील त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता़ याबाबत अविनाश गिरासे यांनी दिलेल्या खबरीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े