शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

यंदा जगण्याचे वर्ष असल्याने नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : यंदा कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. हे वर्ष फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : यंदा कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. हे वर्ष फक्त जगण्याचे वर्ष असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी येथे केले.गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथे शांतता कमिटीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित होते. बैठकीला नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील, पालिकेतील गटनेते प्रा.मकरंद पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुमार, प्रा.लियाकतअली सैयद, एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले उपस्थित होते.या वेळी पंडित म्हणाले की, कोरोना विषाणू संक्रमणामुळे गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्वधर्मियांचे सण हे घरी राहूनच साजरे झाले आहेत. यासाठी शासनाने ११ जुलैच्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. शहरात ३२ प्रतिबंधात्मक क्षेत्र असून याठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याला परवानगी दिली जाणार नाही. २१ आॅगस्टपासून मोहरमला सुरुवात होत आहे. या कालावधीत मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच उत्सव साजरा करावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत सुपडू खेडकर, प्रा.लियाकतअली सैयद, प्रा.मकरंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मानले.