शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांकडून यशवंत तलावाची परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्रेनिमित्त तेथील यशवंत तलावासह तलावासह मंदिराला वळसा घालून दोन किलोमीटरची परिक्रमा ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्रेनिमित्त तेथील यशवंत तलावासह तलावासह मंदिराला वळसा घालून दोन किलोमीटरची परिक्रमा हातात तांदूळ घेत व तो तांदुळ पेरत करण्यात येत आहे. यात्रेत आलेले अनेक भाविक मुक्कामी थांबले असून ते यशवंत तलावात पवित्र स्नान करून दर्शनचा लाभ घेत आहे.महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या तोरणमाळ येथे महाशिवरात्रीला भरणाºया यात्रोत्सवानिमित्त भगवान गोरक्षनाथ मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथ यात्रोत्सव २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भरत आहे तेथे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत आहे. या ठिकाणी मध्य प्रदेशातील निमाड भक्तगण मोठ्या संख्येने रात्र मुक्कामी राहून जागरण करत आहे. त्यांच्याकडून नैवेद्य तयार करून प्रसाद स्वरूपात दिला जात आहे. यात्रेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. त्यात भांडी, घरगृती वस्तू संस्कृतीक दागदागिन्यांचा समावेश आहे.यात्रेत विशेषत: निमाड बांधव व आदिवासी बांधव यांच्या एकरंगी पेहराव यात्रेत आकर्षक ठरत आहे. याठिकाणी पालखी व चैनीचे घटक नसतांनाही भाविकांची श्रद्धेपोटी येथे गर्दी होत असून त्यांच्याकडून नवस फेडण्यात येत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अनेक जैविक जडीबुटी असल्याचे जाणकारांकडून म्हटले जात आहे. जाणकारांना असलेल्या माहितीप्रमाणे आयुर्वेदिक वस्तु यात्रेत विक्रीसाठी आणल्या आहे.४यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आले असून या ठिकाणी आदिवासी संस्कृतीतील साहित्य खरेदी करण्यात येत आहे. त्यात शिबली, रंगीबेरंगी गोंडे, तीर कमान, चाळ घुंगरू, रंगीबेरंगी पट्टे यांचा समावेश आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आगामी भोंगºया बाजाराची तयारी सूरू असल्याचे दिसुन आले.४यात्रेत अनेक भाविक येत असून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही युवक स्वेच्छेने श्रमदान करीत आहे. या स्वयंसेवकांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.४यात्रेसाठी येणाºया भाविकांची संख्या अधिक असून ते मुक्कामीत चथांबले आहे. त्यामुळे कालापाणीपासून थेट दुसºया क्रमांकाच्या पायरीपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवासी स्वत: परिश्रम घेतांना दिसून आले.