शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाणी शहरातील विविध भागात पसरून नवीन वसाहत व शहरातील डोंगरगाव रोड परिसरात गुडघाभर पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला होता.शहरातील पटेल रेसिडेन्सी चौक, दर्गा परिसर, विश्रामगृह चौक, दोंडाईचा रस्ता, सदाशिव नगर, रामदेवबाबा नगर, साईबाबा नगर आदी परिसरातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नवीन वसाहतीतील साठलेले पाणी कमी होत असून नवीन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. डोंगरगाव रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व याच परिसरात मोठे व्यापारी संकुल असल्याने त्यांच्या तळघरात पाणी साचले होते. ते पाणी खाली करण्यासाठी नागरिकांना डिङोल पंपाचे सहाय्य घ्यावे लागत आहे. या पंपाच्या सहाय्याने तळघरातील पाणी खाली करण्यात येत आहे. घरे व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सारंगखेडा परिसरातपंचनाम्यांना गती द्यावीसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व  पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.   महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येथील कृषी सहायक  के.डी. नाईक हे पिकांचे झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करीत आहेत. या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाने जास्त कर्मचारी नेमून पंचनाम्याच्या कामांना गती द्यावी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांनी केली आहे.असलोद येथे 20 घरांच्यानुकसानीचे पंचनामेअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. असलोद गावात  20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी सुरेखा राठोड यांनी केले. तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दुधखेडा गावालगत फरशी तुटल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. असलोद येथील जलवाहिनी तुटल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दुधखेडा धरण पूर्ण भरले आहे. असलोद परिसरातील इतर गावांमध्येही घरांची पडझड झाली असून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. मात्र शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने ते करण्याची मागणी होत आहे.