शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तापी-बुराई योजनेचे काम शनिमांडळपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बसवंत स्वामी, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, माजी आमदार     चंद्रकांत रघुवंशी, उदेसिंग पाडवी, जि.प.चे उपाध्यक्ष राम रघुवंशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, पाईपलाईनद्वारे पहिल्या टप्प्यातील नियोजित ठिकाणी पाणी साठवण करण्याची सुविधा करण्यास कालावधी लागणार असल्याने सदर सुविधा होईपर्यंत शनिमांडळपर्यंत पाणी आणल्यास परिसरातील गावांना याचा लाभ होऊ शकेल. तसेच ठाणेपाडा-२ मध्ये पाणी आणून नंदुरबार शहराला टंचाई प्रसंगी पाणी देता येईल यासाठी व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील २२ राज्यस्तरीय सहकारी उपसा सिंचन योजनेची आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर पाईपलाईनमध्ये गळती झाल्यास तिच्या दुरुस्तीच्या तरतूदीसह प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी. २४ तासाच्या आत गळती दुरूस्ती होईल अशी यंत्रणा असणे गरजचे आहे. या योजनेच्या     आवश्यक कामाबाबत लवकरच    मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नवापूर तालुक्यातील पूर्ण झालेल्या योजनांचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही पाटील म्हणाले. यावेळी लघु पाटबंधारे योजना, देहली, नागन, दरा, कोरडी, रामपूर, रापापूर, इच्छागव्हाण,  पानबारा, उकाई धरणातील पश्चजलातून पाणी उपसा सिंचनद्वारे वापरणे, नर्मदा-तापी वळण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, दुपारी होणारी बैठक सायंकाळी उशीरा झाल्याने सर्व अधिकारी ताटकळत बसले होते.