शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोजमाप केल्यानुसार रुंदीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावांमध्ये अपघात घडू नये, यासाठी ३० मीटर रुंदीकरणासह दुभाजक ...

कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावांमध्ये अपघात घडू नये, यासाठी ३० मीटर रुंदीकरणासह दुभाजक उभारण्यात येत आहेत. परंतु, ब्राह्मणपुरी गावातही या कामासाठी नियोजित ३० मीटर मोजमाप करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कमी अंतराचा रस्ता बनविण्यात आला आहे. यामुळे अपघात घडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

अवजड वाहनांची वाहतूक

शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया हा अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यांतील वाहतूक सुरू असते. केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मालाची वाहतूक शहादा-खेतिया मार्गावर मोठ्या प्रमाणावर होते. अनुषंगाने ब्राह्मणपुरी गावात दुभाजक निर्माण करून रस्ता रुंदीकरण करणे अपेक्षित आहे.

गटारांची दुरवस्था

ब्राह्मणपुरी गावातून जाणाऱ्या कोळदा-खेतिया रस्त्याचे काम खोलीकरण करून करण्यात आले. परंतु, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची या कामामुळे दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात गावातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या गटारांची दुरवस्था झाल्याने योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाण्याची डबकी साचतात. गटारे दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी संबंधित रस्ता रुंदीकरण करीत असलेल्या ठेकेदाराशी संपर्क केला असता संबंधित ठेकेदाराने नियोजित ३० मीटर रस्ता रुंदीकरण होईल, तेव्हा गटारांचे नव्याने बांधकाम करू, असे सांगण्यात आले.

नुकसानभरपाईची अपेक्षा

ज्या गावातून रस्ता जात आहे, त्या गावातील रस्त्यावरील घरे पाडण्यात येत आहेत. परंतु, ब्राह्मणपुरी गावात रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम सुरू करून रुंदीकरणासाठी करण्यात आलेली पिवळी खूण करण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराकडून पिवळ्या खुणेला झुगारून रस्ता रुंदीकरण कमी प्रमाणात करण्यात आले व साइडपट्ट्यादेखील भरण्यात आल्या नाहीत. जर साइडपट्ट्यांचा भराव केला नाही? तर रस्ता रुंदीकरण होईल का, असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून ग्रामपंचायत, रस्त्यावरील घरांचे मालक यांना काहीही पत्र दिले नसल्याने घरे पडणार आहेत की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर घरे पाडतील तर राहायला जायचे कुठे? कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ तर नाही येणार ना? असे विविध प्रश्न निर्माण होत आहे.