शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने परतीच्या पावसाने हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतक:यांवर संकट कोसळले आहे.सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाले. दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्याने दिवाळी साजरी करणा:या संबंधित शेतक:यांचे यंदा अक्षरश: दिवाळे निघाले आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीला देखील कोंब फुटले असून शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे.बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एक कापूस न आल्याने शेतक:यांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे. अशाच प्रकारे उडीद, मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी आपल्याला तारतील, असे शेतक:यांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतक:यांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने शेतक:यांना कढता आला. नाही. डोळ्यादेखत मोठा कष्टाने उभ्या केलेल्या तळोदा तालुक्यातील शेतक:यांच्या डोळ्यादेखत खरीप हंगामातील  पीकांची राखरांगोळी होत आहे.

शेतक:यांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच ज्वारी तसेच सोयाबीची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही पावसाने दिली नाही. त्यामुळे जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवले आहे.खरिप हंगाम आटोपताच शेतकरी रब्बीसाठी नियोजन करीत असतो, मात्र यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे खरिप पीकांची काढणीच लांबली. परिणामी रब्बी हंगामातील पेरण्याही लांबत आहे. मशागतीसह अनेक कामे रखडली असून दादर, ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तळोदा तालुक्यातील शेतक:यांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.