शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तापी खोरे विकासाचा कालबद्ध कार्यक्रम कुठे अडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदूरबार : सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना होऊन कालबद्ध कार्यक्रम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदूरबार : सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना होऊन कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु या कार्यक्रमाचे पुरते बारा वाजले असून रखडलेले प्रकल्प अजूनही मार्गी लागू शकले नाहीत. विशेषत: त्यात नंदूरबार जिल्ह्यातील प्रकल्पांना चालना तर मिळाली पण ते पूर्ण होऊ न शकल्याने जिल्ह्याची शेती अजूनही तहानलेलीच आहे.

तापी खोऱ्याचा विकास व्हावा यासाठी खान्देशातील लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून खास डिसेंबर १९९७ मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाच्या स्थापनेमुळे खान्देशात व विशेषत: नंदूरबार जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, अशा अपेक्षा त्यावेळी व्यक्त झाल्या होत्या. कारण महामंडळ स्थापन झाल्यानंतर या महामंडळाने दहा वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यात तापी खोऱ्यातील पाच मोठे प्रकल्प, २४ मध्यम प्रकल्प, १३८ लघुप्रकल्प, १० उपसा योजना, २४ वाढविस्ताराची कामे अशी एकूण २०१ कामे पूर्ण करण्याची हमी त्यावेळी महामंडळाने दिली होती. त्यामुळे १९९७ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यानंतर साधारणत: २००८ पर्यंत जिल्ह्यातील सर्वच रखडलेल्या प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघेल, अशी आस शेतकऱ्यांना लागून होती. पण प्रत्यक्षात मात्र महामंडळाच्या स्थापनेनंतर १७ वर्षाच्या कालावधीनंतरही १० वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाही.

तापी महामंडळाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोरडी व नागन मध्यम प्रकल्प, अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्प, नंदूरबार तालुक्यातील शिवण मध्यम प्रकल्प, शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्प या मध्यम प्रकल्पांचा समावेश होता तर रंकानाला, अमरावती नाला, लघुपाटबंधारे योजना चौपाळे, सुसरी, चिरडे ता.शहादा, बिलाडी ता.नंदूरबार, बर्डीपाडा, हरीमहू, पिंप्राणे, पानबारा, कारेघाट, नेसू, देवळीपाडा, ढोंग, मेंदीपाडा, भुरीवेल व विसरवाडी ता.नवापूर, धनपूर, इच्छागव्हाण ता.तळोदा या लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश होता. याशिवाय प्रकाशा बुराई उपसा योजनेचाही समावेश होता. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पांच्या कामांना चालना तर मिळाली पण निधी व इतर कारणांनी अद्यापही ते अर्धवटच राहिले आहेत. त्यामुळे गेल्या १७ वर्षात सिंचनाची सुविधा फारशी उपलब्ध झाली नसल्याचे चित्र आहे.

९५१ कोटींचा खर्च तरीही पाणी नाही

जिल्ह्यातील मध्यम व लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांवर गेल्या १५-२० वर्षात जवळपास ९५१.४६ कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र तरीही हे प्रकल्प कुठल्या ना कुठल्या कारणाने अजून अर्धवटच आहेत. त्यातील सर्वात मोठे असलेले प्रकाशा बॅरेज प्रकल्पावर १७६.३९ कोटी तर सारंगखेडा बॅरेज प्रकल्पावर २१५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. बॅरेज प्रकल्प पूर्ण असले तरी तेथील पाणी शेतांपर्यंत पोहोचवणाºया उपसा योजनांची दुरुस्ती न झाल्याने ते पाणी निरुपयोगी ठरले आहे. असेच कोरडी, देहली, शिवण, दरा, नागण या मध्यम प्रकल्पांची कामेही पूर्ण झालेली नाहीत. या प्रकल्पांवरही प्रचंड खर्च झाला आहे.

खर्च झालेल्या रकमेत लघुसिंचन प्रकल्पांवर १८५.६८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण त्या योजनादेखील निधीअभावी रखडल्या आहेत. तापीवरील बॅरेज प्रकल्प पूर्ण झाले पण साठवलेले पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपसा योजना बंदच आहेत. या योजनांचे पुनर्जीवन करण्याचे गुऱ्हाळ गेल्या एक तपापासून सुरू आहे. त्यासाठी निधी दिला पण तो अपुरा आहे. तांत्रिक अडचणीमुळे या योजना रखडल्या आहेत. त्यासंदर्भात सातत्याने शेतकऱ्यांचे आंदोलने होत आहेत पण आश्वासनात केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

५०० कोटींची गरज

तापी पाटबंधारे विकास महामंडळाने हाती घेतलेल्या व सध्या अपूर्ण असलेल्या मध्यम आणि लघुप्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी मिळाल्यास जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या जेमतेम साडेआठ टक्के सिंचनाचे क्षेत्र आहे. ते अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळपास २२ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.