शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोविड काळात मुलांनी काय शिक्षण घेतले? शिक्षकांच्या बैठकीत घेतली मते जाणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर ...

जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर यांनी आयोजित केली होती. यावेळी जिल्हा शिक्षण व या प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहायक व जिल्ह्यातील १०० शिक्षक यावेळी होते. कोविड १९ काळात शिक्षकांना ऑनलाईन – ऑफलाईन माध्यमातून काम करत असताना आलेले अनुभव, अडचणी आणि सद्यस्थिती समजून घेणे, पुढील शैक्षणिक नियोजन करताना कमी कालावधीत अपेक्षित उद्दिष्ट् गाठण्यासाठी काय करता येईल, यासंबंधीचे विचार शिक्षकांकडून समजून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड काळात आपण मुलांपर्यंत शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून कसे पोहोचलो आहोत, या काळात मुले नेमकी काय शिकली आहेत, यासारखे प्रश्न विचारून शिक्षकांना बोलते करण्यात आले. या काळात विद्यार्थी जीवन शिक्षण जास्त शिकले, मूल स्वतःच शिकण्यात सक्षम झाले, शिक्षकांनाही या काळात तंत्रस्नेही व्हावे लागले, या काळात शिक्षक मित्र आणि विषय मित्र यांची खूप मदत झाली, ऑनलाईन सोबतच ऑफलाईन शिक्षणाचे विविध पर्याय मिळाले. पुढील काळात शाळेत विद्यार्थी उपस्थिती १००% राहण्यासाठी सद्यस्थितीला पालकांचे, विद्यार्थ्यांचे सर्वच पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. यासारख्या काही प्रतिक्रिया शिक्षकांनी यावेळी दिल्या. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन शिक्षकांनी सक्रियपणे चर्चेत सहभाग घेतला. शाळांवर नेमके विद्यार्थांना कसे अध्यापन करावे, याची दिशा मिळाली.