शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा असे वारंवार सांगूनही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/नवापूर : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा असे वारंवार सांगूनही ऐकण्याच्या मनस्थित नसलेल्या नागरिकांना आता थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे. एकाच दिवसात तब्बल २५ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नवापूर येथील भाजी विक्रेत्याला पाच दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवापुरात शिक्षा सुनावण्याची ही दुसरी वेळ आहे.शहरातील विविध भागात विना मास्क फिरणाऱ्यांवर आता पोलिसांनी वक्रदृष्टी दाखविली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क लावणे किंवा तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. परंतु नागरिक काळजी घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे आता थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशानाने दिले आहेत. त्यानुसार नंदुरबारातील विविध भागात पोलिसांनी कारवाई करीत २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.यात मिशन हायस्कूल भागात फिरणारे मनोज बाबुराव गायकवाड, सुधीर डेव्हीड साने, राकेश शमसोलीन पंजाबी व भिवसन अशोक नाईक.करण चौफुली व जगताप वाडी भागात गौतम सुन्नबरामली मिस्त्रा, नारायण भामे, सुखलाल शंकर मराठे, देविदास पोपट पाटील, ईकबाल अयनूर खान, भावेश संजय पाटील. सुरेश मगन मराठे, अनिल ताराचंद सोनानाजी, सुनील दयायल मलानी. आयडीबीआय बँकेसमोर गणेश डोंगर सूर्यवंशी, अरुण तुळशीराम पवार, दिपक शिवाजी कानडे, सुलतान शहा बाबूशहा, चंद्रकांत भगवान मोरे, बन्सीलाल महारू बागले.राजपूत पेट्रोलपंप समोर फत्तेसिंग चंदू गावीत, जयेशा रवींद्र देवरे, नारायण रामा मिस्तरी. डुबकेश्वर मंदीराजवळ अंबादास नरहरी कासरा, शंकर पोळ, विनोद श्रावण मराठे यांचा त्यात समावेश आहे.मॉर्निंग वॉक व शतपावली...सकाळी मॉर्निंग वॉक करणारे आणि रात्री शतपावली करणाऱ्यांनाही पोलिसांनी टार्गेट केले आहे. मॉर्निंग वॉक करणाºया सुमारे ३० जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. आता सायंकाळी व रात्री कॉलनी परिसर आणि सामसुम असलेल्या रस्त्यांवर शतपावली करणाºयांविरुद्ध कारवाईसाठी पोलीस सरसावले आहेत.यासाठी पोलिसांच्या पेट्रोलिंग करणारी वाहने विविध वस्ती व कॉलनी भागात फिरत असून टारगट युवकांना फटकेही दिले जात आहेत.मास्क न लावता भाजी विक्री करणार्या व्यावसायीकास नवापुर न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शहरात लागोपाठ घडलेली ही दुसरी घटना आहे.अशपाक मुस्ताक अत्तार (२२) रा.राजीव नगर हा विना मास्क भाजीपाल्याची विक्री करतांना आढळुन आला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली.नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मास्क न लावल्याबद्दल शिक्षेची ही दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेत तरुणाला शिक्षा ठोठावण्यात आली होती. राज्यात घडलेली ही पहिलीच घटना होती. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कृष्णा पवार पुढील तपास करीत आहे.