शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शत-प्रतिशत काँग्रेस आणण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:42 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या बाजूने काैल लागेल याची खात्री ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या बाजूने काैल लागेल याची खात्री आहे. काँग्रेससोबत भाजपाचेही काही मतदार आमच्या सोबत असल्याने त्यांच्या विजयाची खात्री आहे. दुसरीकडे येत्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वांनी आतापासून तयारीला लागावे असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रथमच जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याने काँग्रेस पदाधिका-यांनी आनंद व्यक्त केला.  यावेळी आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, माजीमंत्री पद्माकर वळवी, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषदेचे सभापती  अभिजीत पाटील, नरेश पवार, सभापती रतन पाडवी, कार्याध्यक्ष सुभाष पाटील, नरोत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणूकीत चारही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासह खासदार काँग्रेसचा निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. विधानपरिषद निवडणूकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, २३४ मते ही काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने आहे. यामुळे जिंकण्याची खात्री असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.  दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड.पाडवी यांनी राज्यातील आश्रमशाळा एक डिसेंबर रोजी सुरू होण्यापूर्वी सर्व सुविधा देण्यात येतील. यासाठी २४ रोजी नाशिक येथे बैठक आयोजित करुन प्रकल्पच्या अधिका-यांना विविध सूचना करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. आदिवासी विकास विभागाकडून मका खरेदी केंद्राकडे बारदान नसल्याने ती थांबवण्यात आली होती. परंतू आता महामंडळाच्या संचालकांना सूचना करत मका खरेदी सुरु करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.