शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजना कार्यान्वित नसल्याने प्रकाशा बॅरेजमधील पाणी ठरतेय निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

प्रकाशा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षांपासून १०० टक्के पाणीसाठा होत आहे. आजही बॅरेज तुडुंब भरला आहे. ...

प्रकाशा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षांपासून १०० टक्के पाणीसाठा होत आहे. आजही बॅरेज तुडुंब भरला आहे. या बॅरेजवर ११ उपसा सिंचन योजना आहेत. मात्र सद्य:स्थितीत एकही योजना सुरू नाही.

बॅरेजमधून ७७१ शेतकऱ्यांनी दीर्घकालीन तर ७०शेतकऱ्यांनी हंगामी परवानगी घेतली आहे. दोन्ही मिळून आजच्या स्थितीला फक्त ५५० ते ६०० हेक्टर शेतजमिनीला त्याचा फायदा होत आहे. ११ उपसा सिंचन योजना सुरू झाल्या असत्या तर आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टर शेतीला पाणी मिळाले असते व परिसर सुजलाम सुफलाम झाला असता. प्रकाशा बॅरेज अंतर्गत प्रकाशा, नांदरखेडा, पळासवाडा, शेल्टी, सजदे, बिलाडी, बामखेडा, अडावद, कौठळ, सारंगखेडा, सुजालपूर, बोराळा, कोपर्ली, हाटमोहिदा, ओसर्ली, बोराळे, विखरण, खोंडामळी, शिंदे, सिंदगव्हाण, जुनमोहिदे, मांजरे, भालेर या गावातील शेतकऱ्यांनी दीर्घकालीन व हंगामी परवानगी घेतली आहे. या बॅरेजवर असलेल्या ११ उपसा योजनांची कामे अपूर्ण तर काहींची कामेही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना बॅरेजच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रकाशा बॅरेजवरून समशेरपूर साखर कारखाना पाणी उचलत आहे. तसेच कोपर्ली गावाची पाणीपुरवठा योजना याच बॅरेजवर आहे. भालेर एमआयडीसीने परवानगी घेतली आहे, मात्र अद्याप त्यांनी पाणी उचलणे सुरू केलेले नाही.

बॅरेज प्रशासनाची उदासीनता

प्रकाशा बॅरेजवर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना मार्गावर काटेरी झुडपे उगवले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. सुरक्षा रक्षक आहेत मात्र त्यांना आवश्यक सुविधा नाहीत. बॅरेजवरील ९०पैकी फक्त ११ पथदिवे सुरू आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेचे पथदिवे बसवलेत, मात्र तेदेखील बंद आहेत. सिद्धेश्वर मंदिराकडून येताना रस्त्यावर खड्डे आहेत. परिसरात झाडेझुडपे वाढलेली असून चोरांना सहज चोरी करता येईल, अशी स्थिती आहे. बॅरेजला अधिकारीही भेटी देत नाहीत.