शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मेवासी वनविभागातील वृक्षारोेपनाची मजुरी चार महिन्यापासून थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  तळोदा मेवासी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहाही वनक्षेत्रात यंदा लावण्यात आलेल्या ३२९ हेक्टर क्षेत्रातील वृक्षारोपणाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  तळोदा मेवासी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहाही वनक्षेत्रात यंदा लावण्यात आलेल्या ३२९ हेक्टर क्षेत्रातील वृक्षारोपणाची मजुरी चार ते पाच महिने उलटूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे मजूर संबंधित कार्यालयाकडे सातत्याने हेलपाटे मारत आहेत. येन दिवाळीच्या सणात तरी वरिष्ठ महसूल प्रशासनाने मजुरी उपलब्ध करून द्यावी, अशी मजुरांची मागणी आहे. दरम्यान या कामांवर साधारण एक हजार मजुरांनी काम केल्याचे सांगण्यात आले आहे. तळोदा मेवासी वनविभागात तळोद्यासह खापर, अक्कलकुवा, काठी, मोलगी, वडफळी, अशी सहा वनक्षेत्रे येत असतात. शासनाच्या पाच कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदा सहाही वनक्षेत्रांच्या जवळपास ३२९ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ३७ हजार वेगवेगळ्या प्रजातींच्या वृक्षांची रोपटे लावण्यात आली होती. साधारण एक हजार मजुरांनी वृक्षारोपणाचे काम केले होते. साग, आंबा, सिसम, चिंच, बेहडा, महू, बांबू, सिताफळ, अशी वेगवेगळी रोपे लावली आहेत.वृक्षारोपणासाठी संबंधित यंत्रणेने मजुरांकडून खड्डे खोदणे, वृक्ष लावणे, तेथील निंदणी करणे असे वेगवेगळी कामे करून घेतली आहेत. तथापि या मजुरांना त्यांच्या मजुरीची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे मजूर थकीत मजुरीसाठी संबंधित वनक्षेत्रपालांच्या कार्यालयात सातत्याने थेटे घालत आहेत. विशेषत: ते ग्रामीण खेड्यांमधून मजुरीसाठी कार्यालयात येत असतात. साहजिकच त्यांचा वेळ व पैसा वाया जात असतो. एवढे करूनही पुरेशी मजुरीचे पैसे मिळत नसल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली होती. वास्तविक तब्बल चार ते पाच महिन्यांपासून वनक्षेत्रपालांकडे त्यांची मजुरी थकली आहे. ती तातडीने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा असताना त्याबाबत वरिष्ठ प्रशासनानेच उदासिन भूमिका घेतली असल्याने मजुरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मजुरांची उपजीविकाच मुख्यत: मजुरीवर अवलंबून असताना यंत्रणेने त्यांची मजुरी थकविल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.मजुरांच्या थकीत मजुरीबाबत तळोदा मेवासी वनविभागाकडून माहिती घेतली असता मजुरांची मजुरी थकल्याचे मान्य करून वरिष्ठ प्रशासनाकडे निधीची मागणी केली आहे. परंतु निधीच अद्यापपर्यंत  उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शासन मजुरांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी   रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देत आहे तर दुसरीकडे वृक्षारोपणाचे काम केलेल्या मजुरांना पाच महिने उलटूनही मजुरी  देण्यात आली नसल्याचे विदारक चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन मजुरांच्या थकलेल्या मजुरीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मजुरांची अपेक्षा आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे.

सव्वा कोटींची जिल्हा प्रशासनाकडे मागणीआपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात केलेल्या वृक्षलागवड व इतर कामांवरील मजुरांची मजुरीपोटी येथील मेवासी वनविभागाने डीपीडीसीतून साधारण एक कोटी २९ लाख रूपयांची मागणी केली आहे. दोन वर्षांपासूनच्या निधी थकल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे. तथापि अजून पावेतो निधी उपलब्ध झालेला नाही. निधीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही यंत्रणांनी सांगितले. राज्य शासनाने कोरोनामुळे योजनांना कात्री लावल्याचे म्हटले जात असले तरी मजुरांनी काम केलेल्या कामांचा मोबदला त्यांना देणे अपेक्षित आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतदेखील मजुरांच्या थकलेल्या मजुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र अजूनही त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. निदान लोकप्रतिनिधींनी तरी यावर ठोस पर्याय काढावा, अशी मजुरांची मागणी आहे.

तळोदा मेवासी वनविभागाच्या वनक्षेत्रात करण्यात आलेल्या वृक्षारोपण व इतर कामांच्या मजुरीसाठी डीपीडीसीतून जिल्हा प्रशासनाकडे निधीची मागणी केली आहे. हा निधी प्राप्त झाल्याबरोबर पुढील कार्यवाही करण्यात येईल.    -पी.के. बागुल,उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग कार्यालय, तळोदा