शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

शाश्वत स्वच्छतेवर गावांनी भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रकाशा व लोणखेडा ता. शहादा येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पदाधिकारी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रकाशा व लोणखेडा ता. शहादा येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवक यांना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी ,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रकाशा व लोणखेडा या दोन ग्रामपंचायतीची  माझी वसुंधरा अभियानात निवड करण्यात आली आहे. अभियानात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,    वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमांची अंमलबजावणी व व्यवस्थापन या बाबींसाठी एक  हजार गुण  आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती ना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अभियानाचे नोडल ऑफिसर  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.     कार्यशाळेत उपस्थितांना बनवडी ता. कराड जि. सातारा येथील ग्राम विकास अधिकारी दिपक हेळुंके यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापनामुळे शाश्वत    स्वच्छता राहण्यास कशी मदत होते व त्यातून ग्रामपंचायतीस कशाप्रकारे उत्पन्न मिळते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक येथील  ग्राम विकास अधिकारी जी.आर .आढाव यांनी वृक्ष लागवड ,त्यांचे संवर्धन व भविष्यात यातून ग्रामपंचायतीस मिळणारे उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे  प्रास्ताविक डॉ.वर्षा फडोळ यांनी केले यावेळी         गटविकास अधिकारी आर .बी. घोरपडे ,विस्तार अधिकारी (पंचायत) सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.