शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा काठावरील गावांना विषारी सर्पाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा काठावरील थुवानी येथील शाळेतील दोन विद्याथ्र्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, नर्मदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा काठावरील थुवानी येथील शाळेतील दोन विद्याथ्र्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, नर्मदा काठावरील शेलगदा, अठ्ठी, केली, थुवाणी या गावांमध्ये गेल्या काही वर्षात 70 पेक्षा अधीक जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य रतन पाडवी यांनी केली आहे.प्रवीण रमेश वसावे (10), रोहित खिदार पाडवी (10) रा.अठ्ठी असे विद्याथ्र्याचे नाव आहे. दोन्ही    विद्यार्थी थुवाणी येथील शाळेत शिकत होते. रात्री झोपले असतांना त्यांना सर्पदंश झाला.  रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी धडगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर   मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात  देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्याथ्र्याच्या पालकांना मदत जाहीर करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्यामुळे धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याच्या फुगवटय़ामुळे कचरा व इतर घाणीसोबत सर्प देखील अशा ठिकाणी वाहून येत आहेत. शेलगदा, अठ्ठी, केली, थुवाणी या गावांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या गावांमध्ये गेल्या काही वर्षात 70 पेक्षा अधीक जणांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे. सर्पदंशामुळे या भागात भितीचे वातावरण आहे. नर्मदा काठावरील गावांना संरक्षक भिंत बांधून मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी जिल्हा परिषदेत वेळोवेळी मागणी केली होती. पाठपुरावा देखील केला होता. परंतु उपयोग झाला नाही. प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पहाणार आहे असा सवाल पाडवी यांनी केला आहे.