शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कौटूंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांना पोलीस दादा देणार ‘भरोसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कौटूंबिक वाद, कलह आणि समस्यांमुळे हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांसाठी पोलीस दलाने भरोसा सेल अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कौटूंबिक वाद, कलह आणि समस्यांमुळे हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांसाठी पोलीस दलाने भरोसा सेल अर्थात महिला सहाय्य कक्षाची स्थापना केली आह़े जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला़ कार्यक्रमास पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, बाळासाहेब भापकर, राकेश चौधरी, जिल्हा संरक्षण अधिकारी बी़आऱराणे, अॅड़उमा चौधरी, डॉ़ तेजल चौधरी, कंचन मुलाणी, शितल चौधरी, पल्लवी चौधरी, जिल्हा बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅड़सिमा खत्री, सुप्रिया कोतवाल, अॅड़रश्मी महाले, अॅड़ दिपाली चौधरी, अॅड़ प्रज्ञा वडनगरे, मालती वळवी, मनिषा निकम, योगिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील 100 महिला कार्यकत्र्या व पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या़ पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्याहस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर हेल्पलाईन व टोल-फ्रि नंबर कार्यान्वित करण्यात आला़ कार्यक्रमात बोलताना संरक्षण अधिकारी राणे यांनी सांगितले की, कौटूंबिक हिंसाचारातून रात्री अपरात्री घरातून बाहेर काढल्या जाणा:या व कौटूंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिलांना आश्रय म्हणून वन स्टॉप क्रायसी सेंटर जिल्हा रुग्णालयात सुरु होणार आह़े याठिकाणी महिलांना एकाच छताखाली पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधी सेवा, मानसोपचार तज्ञ, पुनर्वसन आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था केली जाणार आह़े भरोसा सेलद्वारे महिला आणि तिचे कुटूंबिय या दोघांचे समुपदेशन करुन तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आह़े पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक रचना शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजया बोराडे, पुष्पलता जाधव, प्रमिला वळवी हे काम पाहणार आहेत़ महिलांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होईल़