धनाजे येथील भरत पावरा, सुनील परमार, मुगबारी येथील प्रताप पावरा, रवींद्र पावरा, अशोक पावरा, दशरथ पावरा (तिनसमाळ), धडगाचे अनिल लोहार यांनी जायण्टस ग्रुप शहादाचे माजी अध्यक्ष ईस्माईल राजा व प्रा. अनिल शिंदे यांच्या सहयोगाने श्रमदानातून तिनसमाळ येथे वनराई बंधारा साकारला. जवळपास माती नसल्याने लांब अंतरावरून माती खोदून आणून रिकाम्या गोण्या भरून दगडांच्या साहाय्याने हा बंधारा बांधण्यात आला. सुनील परमार यांनी ‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही प्रार्थना सादर केली. विशेष म्हणजे रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेला आणि लॉकडाऊनमध्ये देशातूनच ऑनलाइन शिक्षण घेत असलेला विद्यार्थी वरद पाटील श्रमदानासाठी आला होता. जलप्रेमी प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सक्रिय सहभागाने जलसाक्षरतेचे हे कार्य होत आहे. यासाठी तानाजी पावरा, वसंत पावरा, मोगरा पावरा आदींचे सहकार्य लाभले. आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत वळवी व सचिव अरुण वळवी आदींनी जलसाक्षरता समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
जलसाक्षरता समितीतर्फे तिनसमाळ येथे वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST