शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लस हेच रोगावरील प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले आहे, हे आजवरचे उदाहरण आहे. कोरोनाबाबतही आपल्या शास्त्रज्ञांनी अतिशय कमी वेळात लस तयार केली आहे. त्यासंदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. लसीकरणामुळे स्वार्थाबरोबर परमार्थही साधता येतो. आपण तर स्वस्थ व्हाल व त्यातून समाजालाही सुरक्षित ठेवण्यात आपला वाटा राहणार आहे, असे राष्ट्रीय लसीकरण जागृती समितीचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डॉ.जयंत शाह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रश्न : कोरोनावरील लस १०० टक्के सुरक्षित आहे का?

जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचा थोड्याफार फरकाने काही ना काही परिणाम आहेच. कोरोनावरील सध्या ज्या लसी तयार झाल्या आहेत त्या आपल्या शास्त्रज्ञांनी खूप मेहनतीने व कमी वेळेत तयार केल्या आहेत. जंतूवर प्रक्रिया करून लस तयार केली जाते. ही लस जेव्हा शरीरात दिली जाते तेव्हा ती शरीरातील पेशींना जेव्हा संबंधित रोगाचे जंतू शरीरात आल्यास त्याला कसे प्रतिकार करायचे याबाबत काम करीत असतात. त्यामुळे लस दिल्यानंतर शरीरात काही ना काही बदल झाल्यामुळे प्राथमिक काही प्रतिक्रिया एखाद्या वेळेस दिसतात. त्यात किरकोळ ताप येणे, अंगदुखी असे प्रकार पण हे साध्या औषधीनेदेखील तात्काळ घालविता येतात. मात्र हीच लस आपल्याला गंभीर आजार व मृत्यूपासून वाचविते. केवळ आपणच त्यातून सुरक्षित होत नाही, तर आपल्यापासून इतरांनाही सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे ज्या अफवा आहे, जे गैरसमज आहे ते ते दूर केले पाहिजे व सर्वांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाला पूर्णपणे रोखायचे असेल तर लस हेच महत्त्वाचे हत्यार आहे.