शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक : शेतक-याच्या पॅनकार्डचा वापर करुन १४ कोटीचा जीएसटी थकवत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   एखाद्याला अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक कागदपत्रे देणे किती धोक्याचे ठरु शकते याचा अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   एखाद्याला अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक कागदपत्रे देणे किती धोक्याचे ठरु शकते याचा अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतक-याला आला आहे. अज्ञात व्यक्तीने या पॅनकार्डचा वापर करत बनावट कंपनी स्थापन करुन १४ कोटी रूपयांचा जीएसटी थकवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार शेतकरी खांडबारा ता. नवापूर येथील रहिवासी असून या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, सतीष रावजी पाडवी रा. खांडबारा यांना काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील जीएसटी कार्यालयातील अधिकारी भेटण्यासाठी आले होते. संबधित अधिका-यांनी सतीष पाडवी यांची चाैकशी केल्यानंतर अधिका-यांनी त्यांना अटक करुन औरंगाबाद येथे नेले होते. त्याठिकाणी पाडवी हे कुमकुम टेक्सटाईल नावाच्या कंपनीत समाविष्ट असून त्या कंपनीने १४ कोटी ७१ लाख रूपयांचा जीएसटी थकवल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले. शेतकरी असलेले पाडवी यांनी कधीही एवढ्या मोठ्या रकमेचा आकडा ऐकला नसल्याने त्यांना भोवळच आली होती. त्यांनी गावाकडची जमिन व इतर माहिती दिल्यानंतर अधिका-यांना त्यांच्या पॅनकार्डचा वापर करुन ही फसवणूक करण्यात आल्याचे समजून आल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले. दरम्यान याप्रकरणी सतीष पाडवी यांनी बुधवारी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करत आहेत.

मालेगाव येथील कंपनी असल्याचा दावा

शेतकरी सतीष पाडवी यांची फसवणूक करणा-या अज्ञात व्यक्तीने पॅनकार्डचा वापर करत हा प्रकार केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस केलेल्या प्राथमिक तपासात कुमकुम टेक्सटाईल ही कंपनी स्थापन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कंपनी मालेगाव येथील असल्याची माहिती आहे. शेतकरी पाडवी यांची खांडबारा परिसरात शेती असून ते अल्पभूधारक असल्याची माहिती देण्यात आली आहे.