शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणांची बेपर्वाई अन् नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या 10-12 दिवसांपूर्वी वादळी वा:याने शहरातील तहसील कार्यालय रोडवरील जीर्ण झाड कोसळले होते. तथापि, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या 10-12 दिवसांपूर्वी वादळी वा:याने शहरातील तहसील कार्यालय रोडवरील जीर्ण झाड कोसळले होते. तथापि, या पडलेल्या झाडाची विल्हेवाट अजूनही संबंधित यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहदारीस अडथळा ठरत असून वाहतुकीचीही मोठी कोंडी होते. उन्मळून पडलेले हे झाड उचलण्याबाबत नगरपालिका व वनविभागाने आपआपली जबाबदारी झटकली आहे. जबाबदार वरिष्ठ महसूल प्रशासनानेही याबाबत कानावर हात ठेवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या 10-12 दिवसांपूर्वी प्रचंड वादळवारे आले होते. या वादळामुळे तळोदा शहरातील तहसील कार्यालयाकडील एका ङोरॉक्सच्या दुकानाजवळील लिंबाचे मोठे जीर्ण झाड उन्मळून दुकानावर कोसळून दुकानाचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने घटनेची तात्काळ दखल घेत प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी पाहणी केली. शिवाय दुकानाच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. साधारण एक लाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सुदैवाने महिन्यातील चौथा शनिवार होता म्हणून कार्यालय बंद होते. परिणामी ग्रामीण भागातून कार्यालयीन कामासाठी येणा:यांची गर्दी नव्हती. त्यामुळे अप्रिय घटना टळली. मात्र उन्मळून पडलेले झाड आजही तेथेच ‘जैसे थे’ आहे. ते उचलण्याबाबत कोणत्याच यंत्रणेने कार्यवाही केलेली नाही.  त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वास्तविक वादळी वा:यामुळे रस्त्यातच झाड  कोसळल्याने ते तातडीने उचलून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. असे असताना यंत्रणांनी आपआपली जबाबदारी एकमेकांवर झटकली आहे. सदर दुकानदारही हे झाड उचलून त्याची विल्हेवाट लावण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी परवान्याची पास लागते. या पाससाठी तो सातत्याने वनविभागाकडे चकरा घालत आहे. वरिष्ठांकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे मोघम उत्तर त्याला मिळत असल्याचे तो सांगतो. केवळ वनविभागाच्या परवान्याअभावी हे झाड उचलता येत नसल्याचे सांगण्यात येते.