राजू पावरा ।लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : होय, शाळा बंद आहेत पण... शिक्षण नक्कीच चालू आहे...! नेट, मोबाईल, कॉम्प्युटर, विजेची सुविधा, रस्त्याची सुविधा नसलेल्या धडगाव तालुक्यातील उमराणीच्या काल्लेखेतपाड्यावर... काल्लेखेतपाड्याच्या डोंगरात मात्र रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुले गुरे जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या, डोंगरदऱ्यात, नदी-नाल्यात भरलेल्या शाळेत मात्र मनसोक्त शिक्षणाचा आनंद लुटत आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यात अडकून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्र म्हणजे मुलांची रोजची वर्दळ, किलबिल, गलागलाट, अभ्यास, नाविन्य, आविष्कार... पण सध्या सारं काही स्तब्ध असताना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या काल्लेखेतपाड्याच्या डोंगरात मात्र रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुले गुरे जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या, डोंगरदºयात, नदी-नाल्यात भरलेल्या शाळेत मात्र मनसोक्त शिक्षणाचा आनंद लुटत आहेत. कारण ‘शिक्षक आपल्या दरी’ उपक्रमाअंतर्गत शिक्षक मुलांना आॅफलाईन पद्धतीने शिकवत आहेत. पण काही पालकांची मुले नेहमी गुरे चारायला डोंगरावर सकाळी सात वाजता जायचे व संध्याकाळी परत यायची. ही आडचण लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांनी मुले ज्याठिकाणी गुरे राखत असतात तेथेच जाऊन शाळा भरवायला सुरूवात केली.‘ऊबंटू’ चित्रपटासारख्या एका कथेला शोभणारे ही मुलं आणि त्यांना खिळवाया लावणारे त्यांचे शिक्षक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे हे नक्कीच भविष्य घडविणारे गुरुवर्य. शाळेला सुटी असल्याने पाड्यावरील मुले रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जातात. त्याला स्थानिक आदिवासी पावरी बोलीभाषेत ‘बयडी’ म्हणतात. बयडी म्हणजे गावातील टेकडी ज्याठिकाणी गुरे चारले जातात. पण एकेदिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीवर हजर होतात. सोबत गुंडाळी फळा, सॅनिटायझर, मास्क, खडू आणि भरायला लागते बिनभिंतीची मनसोक्त शाळा. दिवसागणिक दिवस त्या शांत हिरवाईने नटलेल्या डोंगरांना शिक्षणाची चौदाखडी ऐकवाशी वाटू लागते. रोज दोन ते तीन तास मुलांसोबत शिक्षक वेळ देऊन हसत-खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे. पहिल्या दिवशी चार मुले असणाºया बायडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात २० पर्यंत मुले हजर होऊ लागतात. मग सुरू होतो आग्गोबाई ढग्गोबाई, कलामांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजीची वर्ड ट्रेन, गणितीय आकडेमोड, सोबत प्रत्यक्ष निसर्गातून भूगोल...!मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांचे हे प्रयत्न सुरू आहेत. शाळा बंद आहेत. पण शिक्षण घरोघरी, दारोदारी, नदी-नाल्यात, दºया डोंगरात नक्कीच चालू आहे... पण इथे आॅनलाईन शिक्षणाला शून्य किंमत आहे... हे उल्लेखनीय वाटते. शिक्षकांच्या या उपक्रमाचे परिसरातील गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
‘टेकडी’वरील अनोखी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:51 IST