शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात दिवाळी समर्पणाचा अनोखा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:33 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा :  सालाबादाप्रमाणे यावर्षीही विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे तोरणमाळ परिसरात सातपुड्याच्या कुशीत ...

 लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा :  सालाबादाप्रमाणे यावर्षीही विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे तोरणमाळ परिसरात सातपुड्याच्या कुशीत आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी समर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जीवन जगताना अनेक कुटुंबांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु  सगळीकडेच आपण पोहोचू शकत नाही. परंतु आपल्याने जेवढे शक्य होईल तेवढं आपल्या हातून सेवा करणे व समाजातील  गरजू बांधवांना सहकार्य करणे               हा धर्म व आपले कर्तव्य समजून  दरवर्षी विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे आदिवासी बांधवांसाठी दिवाळी भेट व समर्पण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या वेळी शहादा, नंदुरबार, शिरपूर, निझर, तळोदा व विविध शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या  सर्व व्हीएसजीजीएम स्वयंसेवकांनी एकत्र येत या कार्यक्रमात आपली निस्वार्थ सेवा दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  म्हसावद परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रिद्धी-सिद्धी विनायक गणपतीचे दर्शन घेऊन या सेवेचा सर्व स्वयंसेवकांनी शुभारंभ केला. या सेवेत सहभागी होत कहाटूळ, ता.शहादा येथील ग्रामस्थांकडून झापी, ता.धडगाव  येथील कुटुंबियांना गुजर समाजाची प्रसिद्ध मिठाई ‘संजोरी’   प्रदान करण्यात आली. विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळाचे सदस्य व समाजातील अनेक दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या परिसरातील समाजबांधवांना किराणा सामानासह, ब्लँकेट, चादर, फराळ, मिठाई, चप्पल, आवश्यक त्याठिकाणी वैद्यकीय उपचार करून दिवाळीनिमित्त मानव सेवा करत दीपावलीचा खराखुरा आनंद  व समाधानाचा अनुभव  घेतला.

खडतर वाटेतून केला प्रवास...खडकी व झापी हा तोरणमाळ परिसरातील अत्यंत दुर्गम असा परिसर व त्याठिकाणी पोहोचण्यासाठी खडतर अशी वाट आणि विपरीत परिस्थिती. तरीही या स्वयंसेवकांनी या समाज बांधवांपर्यंत पोहोचून आपला दिवाळी समर्पण व भेट हा संकल्प पूर्ण केला. याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या या समाजसेवेचे कौतुक करण्यात येत आहे. या समर्पण सेवेदरम्यान दिवाळीनिमित्त लेवा गुजर समाजातील आर्थिकरित्या दुर्बल कुटुंबानाही दिवाळी भेट म्हणून फराळ व मिठाईसह रोजच्या गरजेचा सामानाचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या अशा ५२ कुटुंबाना एक महिन्याचे किराणा साहित्य, दिवाळी फराळ व थंडीच्या बचावासाठी ब्लॅन्केट आदी वस्तूंचे किट व्हीएसजीजीएमच्या माध्यमातून गावोगावी दिवाळी भेट म्हणून देण्यात आले.