शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एक हात व एक पाय असलेला उमेश शाळेसाठी दररोज करतो आठ कि.मी.पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:33 IST

किशोर मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : ‘जिंदगी आसान नही होती, आसान बनना पडता है.., कुछ नजर अंदाज ...

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : ‘जिंदगी आसान नही होती, आसान बनना पडता है.., कुछ नजर अंदाज करके, कुछ बरदास्त करके..’ याचा प्रत्यय देणारे जीवन जगत आहे सातपुडय़ातील दुर्गम भागातील उमेश भिमसिंग वसावे हा बालक. एक हात व एक पाय नसलेला व जो हात आहे त्याचीही बोटे चिकटलेली. अशा स्थितीत कुठलाही आधार न घेता एका पायावर तब्बल चार किलोमिटर चालत जात तो शाळेत पोहचतो. खापरान या पर्वत माथ्यावरील गावातून पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आमली पुनर्वसन येथे तो दररोज ये-जा करतो. अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगरांगेतील गंगापूर गृपग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खापरान या छोट्याश्या गावात  35 घराची दीडशे लोकसंख्येची वस्ती. गाव उंचावर असल्याने प्राथमिक सुविधांपासून वंचीतच. याच गावात भिमसिंग कागड्या वसावे यांचा उमेश हा मुलगा. डावा पाय व उजवा हात नसलेला उमेश. जो हात आहे त्याचे बोटं देखील एकमेकांना चिकटलेले. केवळ अंगठा सुस्थीत. अशा स्थितीत कसलाही आधार न घेता उमेश दररोज शाळेसाठी साडेतीन ते चार किलोमिटर पायवाटेने पायपीट करतो. गेल्या पाच वर्षापासून त्याची ही दिनचर्या आहे. सध्या तो नववीत शिकत आहे. शिकण्याची जिद्द अंगी असल्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तो नियमित शाळेत येतो. अभ्यासात देखील तो हुशार आहे. त्याच्या कुटूंबात आई, वडील व एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. वडिल एक एकरच्या शेतीत कशीतरी गुजरान करतात. खूप शिकून मोठे व्हावे व वडिलांच्या गरीबीच्या परिस्थितीतून कुटूंबाला बाहेर काढावे अशी जिद्द उमेश बाळगून आहे. देवमोगरा आमली पुनर्वसन येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकही त्याला आवश्यक ती मदत करतात. उमेशला आता ख:या अर्थाने मदतीची गरज असून कृत्रीत   अवयव भेटल्यास तो त्या आधारे सहज आपली दिनचर्या पार पाडू शकतो. 

हाताचे बोटं चिकटलेले असल्याने एका बोटाच्या आधारे पेन पकडून लिहिण्याचे काम तो करतो. गावातच त्याने  बालवाडी, जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथी चे शिक्षण पुर्ण केले. पुढील शिक्षणाची सुविधा चार किलोमिटर लांब देवमोगरा पुनर्वसन येथे असल्याने त्याने तेथे शिक्षण घेण्याचे ठरविले. शिक्षणाची जिद्द त्याला शांत बसू देत नाही. नियमित घरापासून चार किलोमीटर अंतरावर शाळेत जाण्यासाठी परत तेवढेच अंतर शाळेतुन घरी येण्यासाठी एका पायाने कसलाही आधार न घेता कुदत कुदत अंतर पार करीत असतो. वाटेने कुणी दुचाकीवाले भेटलेच तर त्याला तेवढी लिफ्ट भेटते.