शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात माथेफिरूने कापली पपईची दोन हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांनी यंदा पपईची लागवड केली होती. मंगळवारी ...

बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांनी यंदा पपईची लागवड केली होती. मंगळवारी सकाळी ते मजुरांसह शेतात गेले असता, परिपक्व होत आलेल्या पपईच्या झाडांची धारदार शस्त्राच्या साहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले. अज्ञाताकडून सुमारे १ हजार ७०० झाडे कापल्याचे मोजणीतून समोर आले. दरम्यान, दहा दिवसांपूर्वीदेखील याच शेतकऱ्याची पपईची ५० झाडे अज्ञात व्यक्तीने कापली होती. तीन एकरातील पपईसाठी शेतकरी दत्तू पाटील यांनी ७५ हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला होता. हा खर्च वाया गेल्याने समस्या निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यातही बोरद येथील जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या करणखेडा रस्त्याला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाचीसुद्धा नासधूस करण्यात आली होती. बोरद पोलीस दूरक्षेत्रात एकाच महिन्यात तिसरी घटना घडल्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

मंगळवारी रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शेतात कुणीही नसल्याच्या अंदाज घेत कृत्य केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कापण्यात आलेली सर्व झाडे ही अर्ध्यातून मोडल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश खोंडे, छोटू कोळी, रामोळे, सचिन अहिरे यांनी शेतात पाहणी करून आढावा घेतला.

एप्रिल महिन्यात या पपईची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या पपईला बऱ्यापैकी फळ व फुलोरा आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न येणार असे दिसून येत होते. दरम्यान, असा प्रकार घडल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अज्ञातांनी हिरावून नेला असल्याचे बोलले जात आहे.

तीन एकर क्षेत्रात तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यात मागील आठवड्यात ५० च्या जवळपास पपईच्या झाडांची माथेफिरूने कत्तल केली आणि आता पुन्हा तब्बल दोन झाडांची कत्तल केल्याने पायाखालची जमीनच सरकली. मागील आठवड्यात तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची माहिती शेतकरी दत्तू पाटील यांनी दिली.

दरम्यान, बोरद शिवारात अज्ञात माथेफिरू कडून झाडे कापली जाण्याचे घडणारे प्रकारे हे गंभीर आहेत. अज्ञात व्यक्तीला शोधून कठोर कारवाई करणार आहे. बोरद शिवारात रात्रीची गस्त सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी सांगितले.