शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार अंगणवाडींना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठ्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST

चार वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीजपुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे ...

चार वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीजपुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे आला होता; परंतु अनेक अंगणवाड्या या दुर्गम भागात, डोंगराळ भागात चालतात. अशा ठिकाणी वीजपुरवठा शक्य नसल्यास सौरऊर्जेद्वारा अशा अंगणवाडींना वीजपुरवठा करावा, असे ठरले होते. त्यानुसार तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी तसे आदेशही दिले होते; परंतु मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडूनच तसा प्रस्ताव गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार अंगणवाड्या अंधाराचा सामना करीत आहेत.

जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी आहेत. त्यापैकी काही अंगणवाडींना वीजपुरवठा केला जातो. काहींनी तो घेतला देखील आहे. चार वर्षांपूर्वी १७ अंगणवाड्यांनी वीजपुरवठ्यासाठी कोटेशन भरलेले होते. सद्य:स्थितीत जवळपास दोन हजार अंगणवाडींना वीजपुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता; परंतु नंतर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

विविध कामे रखडतात

अंगणवाड्यांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषित बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचे सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना संगणक पुरवठा करणे आणि त्या अनुषंगाने वीज जोडणी देणे आवश्यक आहे; परंतु अंगणवाडींकडे एवढा व्याप असतानाही संगणकही दिले गेले नाहीत किंवा वीज जोडणीदेखील अद्यापपर्यंत दिली गेली नाही. सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा झाल्यानंतर संगणक पुरविले जातील, अशी अपेक्षा आहे. कारण सध्या देण्यात आलेल्या टॅबला अनेक अडचणी येत आहेत. संगणक राहिल्यास कामकाज सुटसुटीत होऊ शकते.

शाळांचीही तीच गत

नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकूण एक हजार ३९३ शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार ५३ शाळांना वीजपुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे; परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्यादेखील १०० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकूण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.

दुर्गम भागात अधिक

वीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत. अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहोचलेली नाही तेथे शाळेला कुठून वीज मिळेल, असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यांतील ३००, तर इतर तालुक्यांतील ४० शाळांचा समावेश आहे.

सध्या शासनाचा सौरऊर्जेवर सर्वाधिक भर आहे. अनेक गाव व पाड्यांवर सौर दिवे, पथदिवे, सौर पंप पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांनाही सौरऊर्जाद्वारे वीजपुरवठा झाल्यास कर्मचाऱ्यांना संगणकावर अनेक कामे करता येणार आहेत. सध्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्यावर नियमित कामांपेक्षा इतर कामांचाही बोजा वाढला आहे. शिवाय दैनंदिन रिपोर्ट मोबाईल किंवा टॅबद्वारे वरिष्ठांना पाठविण्याची सक्ती आहे. त्यामुळे अडचणी येतात.