शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात दोन लाख पक्ष्यांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST

बर्ड फ्लूचा धोका माणसात होणार नाही बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण ...

बर्ड फ्लूचा धोका माणसात होणार नाही

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आतापर्यंत प्राण्यांमधून माणसे बाधित होण्याची जगातील संख्या ही ८६२ असून त्यामुळे ४५५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात मात्र पक्ष्यांमधून माणसात हा आजार जडण्याचे प्रमाण तसे नसल्याचे दिसून आले आहे. ७० अंशापेक्षा अधिक तापमानात चिकन, अंडी उकळल्यास ते सुरक्षित होत असल्याने भारतात बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तरी देखील नवापूरमधील पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेशी निगडित कर्मचारी आणि कुक्कुटपालन केंद्रातील कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून टॅमी फ्लूचा डोज दिला जात आहे. पक्ष्यांची संख्या मोठी असल्याने ते नष्ट करण्याच्या प्रक्रियेला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

डॉ. राजेंद्र भरूड, जिल्हाधिकारी

तिसऱ्या दिवशी ९१ पथक नियुक्त

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू नवापूरात सुरू झाले आहे. तिसऱ्या दिवसासाठी नवापूर शहरात नाशिक विभागातील जळगाव १६, नाशिक २७,अहमदनगर ३६ तर नंदुरबार येथील १२ असे ९१ पथक कार्यरत झाले आहे. एका पथकात १ पशुधन विकास अधिकरी,१ पशुधन पर्यवेक्षक, २ परिचर,असे पाच असे एकूण ३८९ कर्मचारी किलिंग ऑपरेशनात सहभागी झाले आहे. सोबतच ९५ पशुधन विकास अधिकारी आहेत.

किलिंग ऑपरेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास

किलिंग मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून घामाने मोठा त्रास होत असल्याने व अनेक कर्मचाऱ्यांना उलटी झाल्याची समस्या जाणवत आहे. आमलीवाला पोल्ट्रीतील चार कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याने तात्काळ उपचार करण्यात आला.त्यासाठी सर्व पोल्ट्रीमध्ये आरोग्य पथकाचे डाॅक्टर नर्स अशी टिम कार्यरत आहे.

नाशिक महानगरपालिकेतील यंत्र दाखल

नवापूरातील बर्ड फ्ल्यू मोहिमेत नाशिक महानगरपालिकेचे यंत्रणा व साधन सामग्री मागवण्यात आली आहे.सदर यंत्रणा तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांची विष्ठा काढण्यासाठी काम करणार आहे.

तीन ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था

नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी नवापुरात दाखल झाले आहे. त्यांची निवासाची व्यवसाय तीन ठिकाणी करण्यात आली आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचारी निवासात तर देवळफळी भागातील शासकीय मुलांचे वसतिगृहात तर उर्वरितांची सिनियर काॅलेजच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे.