शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने दोन बैल व गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बुधवारी पहाटे दोन वाजता खांबावरुन विजेची तार तुटून पडल्याने दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बुधवारी पहाटे दोन वाजता खांबावरुन विजेची तार तुटून पडल्याने दोन बैल व गाय ठार झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत निंबा राजाराम कोळी हे जखमी झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे शिलावद बरडा भागातील निंबा राजाराम कोळी हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांनी रात्री आपल्या अंगणात दोन बैल व गाय बांधली होती. त्यांच्या आई सविता राजाराम कोळी या अंगणातच खाटेवर झोपल्या होत्या. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास खांबावरून अचानक विजेची तार खाली पडली. ही तार सविताबाई झोपलेल्या खाटेवर पडली. मात्र त्यांनी अंगावर जाड गोधडी पांघरल्यामुळे त्यांच्या अंगाला स्पर्श झाला नाही. मात्र जवळच बांधलेल्या दोन बैल व गायीवर ही तर पडली. सविताबाईंनी भेदरलेल्या अवस्थेत घरात झोपलेल्या निंबा कोळी यांना आरडाओरड करून बोलावले. बाहेर अंधार असल्याने निंबा कोळी यांना तार दिसली नाही. त्यांचा पाय त्या वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेवर पडल्याने ते बैलगाडीवर फेकले गेले. त्यात त्यांना मुका मार बसून जखमी झाले. मात्र त्यांचे दोन बैल व दुभती गाय जागीच ठार झाले. या दुर्घटनेमुळे निंबा कोळी यांचा उदरनिवार्हाचा मार्ग आजच बंद झाला आहे. दूध देणारी गाय व शेतात राबणारे दोन बैल अचानक डोळ्यासमोर मरण पावल्याने त्यांना रडू कोसळले. घटनेनंतर परिसरातील लोकांनी लाईनमन व वायरमन यांना बोलवून वीजपुरवठा बंद केला.  कोळी यांना माजी सरपंच रफीक खाटीक व अरुण भिल यांनी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत   पाटील, ग्रा.पं. सदस्य अरुण भील, हरी पाटील आदींनी भेट दिली. सकाळी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी गौतम बोराळे, उंद्या गुलाले, सोहील शेख यांनी या घटनेचा पंचनामा केला. त्यात 70 हजाराचे दोन बैल व 30 हजाराची गाय ठार झाल्याने त्यांचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा त्यांनी केला. या वेळी तलाठी डी.एम. चौधरी यांनीही या घटनेचा पंचनामा करुन तहसीलदार मनोज खैरनार यांना अहवाल पाठविला. पशुवैद्यकीय अधिकारी योगेश देशमुख व परिचर गणेश धनगर यांनी बैल व गायीचे शवविच्छेदन केले.