शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : 2017-18 मधील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने तळोदा तालुक्यातील दोन हजार 499 शेतक:यांना अद्यापर्पयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : 2017-18 मधील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने तळोदा तालुक्यातील दोन हजार 499 शेतक:यांना अद्यापर्पयत शासकीय अनुदान मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतक:यांना लवकरात लवकर शासकीय अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. गतवर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शासनानेही या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत कापूस उत्पादक शेतक:यांना मदत म्हणून अनुदान दिले होते. त्याअनुषंगाने तळोदा तालुक्यात सात हजार 231 शेतकरी अनुदानास पात्र ठरले होते. परंतु यातील दोन हजार 499 नुकसानग्रस्तांना अद्यापर्पयत अनुदान मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रारंभी तीन हजार 980 लाभाथ्र्याना चार कोटी 23 लाख 35 हजार 142 रुपये वाटप करण्यात आले. यानंतर मार्च अखेर्पयत तीन हजार 242 शेतक:यांसाठी तळोदा महसूल विभागाने तीन कोटी  34 लाख 30 हजार 524 रुपयांची शासनाकडे मागणी केली होती. मात्र त्यापैकी  86 लाख रुपयेच मार्च अखेर  आल्याने ही रक्कम 743 लाभाथ्र्याना देण्यात आल्याने उर्वरित दोन हजार 499 लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित असल्याचे                 चित्र आहे. त्यामुळे संबंधीत वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून उर्वरित लाभाथ्र्यासाठी दोन   कोटी 48 लाख तीन हजार 54            हजार रुपयांसाठी पाठपुरावा करून उर्वरित लाभाथ्र्याना न्याय द्यावा,  अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधीत वंचित शेतकरी तलाठी कार्यालय व बँकांमध्ये   चकरा मारत असून, या शेतक:यांना अनुदान आल्यावर त्वरित अनुदान देण्यात येईल, असे निवासी नायब तहसीलदार एस.बी. लोमटे यांनी सांगितले.