शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी व सप्तशृंगी माता मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:55 IST

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजाभवानी आणि खान्देशची कुलस्वामीनी माता सप्तशृंगी यांच्या शहाद्यातील ...

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजाभवानी आणि खान्देशची कुलस्वामीनी माता सप्तशृंगी यांच्या शहाद्यातील मंदिरांनी नवरात्रोत्सवाचा उत्साह वाढविला आहे.शहरात पाच देवींची मंदिरे असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून मान्यता पावलेल्या तुळजाभवानी माता व अर्धेशक्तीपीठ म्हणून मान्यता पावलेल्या माता सप्तशृंगी देवीसोबतच अंबाजी देवी, गायत्री माता आणि हिंगलाज माता या पाच देवींची सुंदर मंदिरे आहेत. शहराच्या प्रवेशद्वारालगतच माता सप्तशृंगीदेवी व माता तुळजा भवानी देवीच्या मंदिराने शहरातील धार्मिक वैभवात भर घातली आहे.सप्तशंृगीदेवीचे दोंडाईचा रोडवरील सुंदर मंदिर 1990 साली बांधले गेले. या मंदिरात सुमारे एक टन वजनाची आणि साडेचार फूट उंचीची भगवतीची पांढरीशुभ्र बोलकी मूर्ती आहे. जयपूर (राजस्थान) येथून ही मूर्ती तयार करण्यात आली होती. विविध शस्त्रांसह 18 भूजा असलेली ही मूर्ती अतिशय रेखीव आहे. माजी नगराध्यक्ष स्व.काशिनाथ पाटील व तत्कालीन मुख्याधिकारी हनुमंत भोंगळे यांचा या मंदिर निर्माण कार्यात सिंहाचा वाटा होता. स्व.गोविंदराम अग्रवाल यांनी या मंदिरासाठी जागा मंदिर ट्रस्टला दिली आहे. 30 एप्रिल 1990 रोजी देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शतचंडी यज्ञ करण्यात आला होता. स्व.पी.के.अण्णा       पाटील व हनुमंत भोंगळे यांनी सपत्नीक अरणी मंथनाने या यज्ञासाठी अग्नी प्रज्वलीत केला होता. या यज्ञासाठी पाच यजमान सपत्नी तीन दिवस पूजेस बसले होते. तर 25 ब्राrाणांकडून हा यज्ञ करण्यात आला होता.सप्तशृंगी माता मंदिराजवळच महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजा भवानीचे सुंदर मंदिर आहे. दिनदयाल नगर परिसरात 1993 साली हे मंदिर उभारण्यात आले होते. शहादा येथील  स्व.अॅड.प्रकाश साबळे व माजी नगरसेवक लक्ष्मण कदम यांच्या परिश्रमातून हे मंदिर निर्माण झाले आहे. 29 एप्रिल 93 रोजी मोठय़ा उत्साहात तुळजा भवानी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती.या मंदिरील माता तुळजा भवानीची मूर्ती ही हुबेहूब तुळजापूर येथील मूर्तीची प्रतिकृती आहे. एकाच काळ्या दगडात कोरलेल्या या मूर्तीवर उजव्या बाजूस सिंह असून, डाव्या बाजूस तपस्वीनी उलटे टांगून घेऊन तपश्चर्या करीत आहेत. मूर्तीवर मार्केडेय ऋषी पुराण सांगत असलेली प्रतिमा कोरली आहे. देवीने मस्तकी स्तंभ धारण केला आहे. डाव्या स्कंधाजवळ सूर्य आहे तर उजव्या स्कंधाजवळ चंद्र आहे. हातात विविध शस्त्रे आहेत. डाव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसला आहे. पायाखाली रेडय़ाचे शव आहे. ही सुंदर आणि एकाच दगडात कोरलेली ही मूर्ती आहे.नवरात्रोत्सवात सप्तशृंगी मंदिर ते तुळजाभवानी मंदिरार्पयत संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीने फुलतो.  उत्साह वाढतो. या दोन्ही मंदिरावर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना सुविधा पुरविल्या जातात.