शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने विजेची तार तोडल्याने घोडजामणे रस्त्यावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  तालुक्यातील घोडजामणे गावानजीक उसाने भरलेल्या ट्रकने वीजतार तोडल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर वीजतार रस्त्यावर लटकली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  तालुक्यातील घोडजामणे गावानजीक उसाने भरलेल्या ट्रकने वीजतार तोडल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर वीजतार रस्त्यावर लटकली होती. वीजपुरवठा सुरू असतानाही श्रीरामपूर-सुरत बस व मालेगाव-सुरत या बसचालकांनी धोकादायक पद्धतीने बस मार्गस्थ केली. वीजतार तुटल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.रस्त्यावर वीजतार तुटल्याची माहिती सरपंच राजकुमार गावित यांनी नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोनद्वारे दिली व तत्काळ वीजपुरवठा बंद करण्याचे सांगितले. तोपर्यंत ग्रामस्थांनी डीपीचा फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. या घटनेने शेतात काम करणारे शेतकरी व महिला थोडक्यात बचावल्या. हा वीजपुरवठा नवापूर तालुक्यातील घोडजामणे ग्रामपंचायतअंतर्गत तीन फेजलाइन शेतीसाठी वापरली जाते. नवापूर तालुक्यातील मोरथुवाहून ऊस भरून ट्रक (एम.एच.झेड. २१४८) नाशिक जिल्ह्यात जात असताना उसाच्या फटक्याने वीजतार तुटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही वेळातच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यादरम्यान, नवापूर शहरात शनिवारी आठवडे बाजार भरतो. बाजार करून प्रवासी वाहतूक करणारे चालक ग्रामीण भागातील ग्रामस्थांना वाहनाच्या टपावर बसवून धोकेदायक पद्धतीने मार्गस्थ होत होते. ग्रामस्थांनी विरोध केला तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विजापूर येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा बंद करून लाकूड व बांबूने तारवर करून वाहनचालकांना मदत केली. काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.