शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक संदेश देत साजरा होणार आदिवासी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यंदा आदिवासी दिनाचे सामुहिक कार्यक्रम राहणार नाही, भव्यदिव्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख दाखविणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यंदा आदिवासी दिनाचे सामुहिक कार्यक्रम राहणार नाही, भव्यदिव्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख दाखविणारी रॅलीही नाही आणि समाजप्रबोधपर व्याख्यानेही राहणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावागावात सामाजिक उपक्रम राबवून यंदाचा आदिवासी दिन साजरा होणार आहे. मात्र, युवकांमध्ये या निमित्ताने उत्साह व जोश मात्र कायम असल्याचे चित्र आहे.आदिवासी दिनाचा दरवर्षी मोठा उत्साह असतो. नंदुरबारात जिल्हास्तरीय सोहळा साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हाभरातील आदिवासी बांधव, विद्यार्थी, विचारवंत एकत्र येतात. यानिमित्ताने आदिवासी संस्कृतीचेही दर्शन घडते. यंदा मात्र कोरोनामुळे सामुहिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे यंदाचा आदिवासी दिन गावागावात साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी महासंघ व जिल्हा प्रशासनाने याबाबत आवाहन केल्याने त्यांच्या आवाहनाला समाजाने प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे यंदा आदिवासी दिन सार्वजनिक रित्या साजरा न होता गावागावात साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. त्याअंतर्गत सामाजिक उपक्रम, वैचारिक प्रबोधन, वृक्ष लागवड यासह इतर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गावागावात तयारीही करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक अंतर पाळून आणि आवश्यक त्या सर्व सुचनांचे पालन करून हा दिवस साजरा करावा असे आवाहन आदिवासी महासंघ व प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या आदिवासी बांधवाचे महत्वाचे योगदान आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात नव्याची कास धरतानाच आदिवासी समाजाने आपली सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवली आहे. केवळ संस्कृतीच नव्हे तर महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल निसर्गसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यातही आदिवासी समाजाचा मोठा वाटा आहे. लोकसहभाग व लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे संवेदनशील नेतृत्व जेव्हा एकदिलाने काम करतात तेव्हा दुर्गम भागाचे चित्र झपाट्याने बदलू शकते असे मत आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी या निमित्ताने व्यक्त केले.