शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना विज्ञान केंद्र हाताळणीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 33 मराठी/उर्दू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याना वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 33 मराठी/उर्दू शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आह़े या केंद्रातील साहित्य वापराविषयी  शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गातून माहिती देण्यात आली़ मंगळवारी डी़आऱ हायस्कूलमध्ये हा प्रशिक्षण वर्ग पार पडला़  जिल्ह्यातील गट शहर साधन केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आह़े केंद्राच्या उभारणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अहमदाबाद येथील संस्थेची निवड केली आहे. त्यांच्यामार्फत साहित्य पुरवठा आणि विज्ञान केंद्र उभारणी केली जात आहे. राज्यस्तरावर निवड केलेल्या या नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रात नंदुरबार जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. यु-डायस, शाळांची इमारत, भौतिक सुविधा, पटसंख्या व इतर निकषानुसार ही निवड करण्यात आली आह़े नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारल्यानंतर 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षात उभारणी केलेल्या विज्ञान केंद्रातील शिक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. यात विज्ञान केंद्रातील साहित्याद्वारे विद्याथ्र्यांना शिकवणे, साहित्याची  हाताळणी तसेच साहित्य उपयोगीते बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, सहायक कार्यक्रम अधिकारी मनिषा पवार, प्रा़ डी. एस. सोनवणे, यांनी  भेट देत मार्गदर्शन केल़े  यावेळी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता शिवाजी ठाकूर, विषय सहाय्यक अलका पाटील यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रिा़ किरण पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना केंद्रातील साहित्य हाताळणीचे प्रशिक्षण दिल़े 

जिल्ह्यात 2017-18 या वर्षात 9, 2018-19 या वर्षात 12 शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची उभारणी करण्यात आली आह़े यंदा पुन्हा 12 शाळांची निवड करुन तेथे केंद्र उभारण्यात आल़े यामुळे जिल्ह्यातील 33 शाळांमध्ये प्रयोगशाळांची निर्मिती झाली आह़े