शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील वाहतूक धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील हलालपूर गावाजवळील फरशी पूल तुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. या तुटलेल्या पुलावरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील हलालपूर गावाजवळील फरशी पूल तुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. या तुटलेल्या पुलावरुन वाहणा:या पाण्यातून जीव धोक्यात टाकून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. या पुलाची व रस्त्याची तात्पुरती का होईना दुरुस्ती करण्याची मागणी धवळीविहीर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.हलालपूर गावाजवळील नदीवरील फरशीपूल गेल्या आठ-दहा दिवसांपासून पूर्णत: तुटल्याने  पुलाचे सर्व पाईप बंद झाले आहेत. पाईपातून पाणी न वाहता रस्त्यावरुन गुडघाभर पाणी वाहत आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून दळणवळण ठप्प झाले आहे. त्यातच या नदीला दररोज पूर येत असल्याने पर्यायी  मार्ग हा बुधावल रस्त्याला जोडला जातो. परंतु या रस्त्याचेही नुकतेच खडीकरण झाले असून मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. हलालपूर रस्त्यावरील फरशी पुलावरील सर्व पाईप मोकळ करण्यात येऊन भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव करण्यात यावा. जेणेकरुन या मार्गावरुन वाहने ये-जा करू शकतील. तसेच गणेश बुधावल रस्त्यावरुन धवळीविहीरकडे जाणा:या रस्त्यावरील खड्डेही मुरुम टाकून बुजण्यात यावेत.या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अॅड.दारासिंग पावरा, भगवानसिंग  मोरे, धनसिंग पावरा, मणिलाल पावरा, बिपीन पावरा, गोविंदा           पावरा व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.