शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर खड्डय़ांमुळे वाहतुकीला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सोरापाडा, अक्कलकुवा गावालगतच्या वरखेडी नदीवरील पुलावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सोरापाडा, अक्कलकुवा गावालगतच्या वरखेडी नदीवरील पुलावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी आणि चिखल साचल्याने यातून वाट काढत पादचा:यांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे या पुलावर वारंवार वाहतूक खोळंबत असून, शहरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कललकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलाचे खड्डे गेल्या महिन्यातच बुजविण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यामुळे या पुलावरील खड्डय़ांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचून पुलास तलावाचे स्वरुपच आले आहे की, काय असे चित्र दिसून येत आहे. पुलावर चिखलाचे पाणी साचून डाबके तयार झाल्याने सोरापाडा येथे जाणा:या शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरील डबक्यांमध्ये साचलेल्या चिखलमय पाण्यामुळे वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने विद्याथ्र्याच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत.  या पुलावर सकाळपासूनच साचलेल्या चिखलमय पाण्याच्या डाबक्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ-मोठय़ा रांगा लागल्यामुळे दुपारी दोन वाजेर्पयत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जामली नर्सरी ते मोलगी रोडर्पयत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन वाजेनंतर वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवारसह कर्मचा:यांना यश आले. अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलावरील डबक्यांमध्ये चिखलमय पाणी साचल्याने सोरापाडा येथे जाणा:या शाळकरी मुलांच्या  अंगावर हे घाण पाणी उडून नये म्हणून वाहनधारक जीव धोक्यात घालीत मार्गक्रमण करत आहेत. त्यातच वाहनधारकांच्या गर्दीमुळे पुलावर धोकादायक स्थिती निर्माण होत असून, ते अपघातास कारणीभूत ठरू पहात आहे. मात्र याकडे संबधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शाळकरी मुलांसह वाहनधारकांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.