शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तापी जन्मोत्सवानिमित्त वस्त्रार्पणाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:09 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : आषाढ शुद्ध सप्तमीनिमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे  सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : आषाढ शुद्ध सप्तमीनिमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे  सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव नदीला साडी अर्पण करण्यात           येऊन साजरा करण्यात येतो़ शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत खान्देशासह गुजरात राज्यातील  शेकडो                भाविक सहभागी होऊन पूजन  करतात़ प्रकाशा ता़ शहादा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आह़े  संगमरवरी दगडातील  देवीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी होत असली तरी आषाढ महिन्यातील  सप्तमीला येणारा तापीनदीचा जन्मोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो़ तापी नदीचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा नेमकी कधी व कोणी सुरु केली, याबाबत ठोस असे पुरावे नसले तरी प्राचीन काळापासून नदीचे पूजन करण्याची परंपरा असल्याचे सांगण्यात येत़े   दरम्यानच्या काळात तापी नदी काठावरील गावांमध्ये राहणा:या महिला देवी तापीच्या नावाने तीन दिवसांचा उपवास करतात़ पंचमीपासून सुरु होणारे हे उपवास सप्तमीला सोडवले जातात़                 उपवास सोडण्यापूर्वी त्यांच्याकडून तापी महात्म्याचे वाचन  करतात़ शेवटचा अध्याय सप्तमीला तापी नदीला साडी अर्पण   करण्यापूर्वी वाचून पूजन करण्यात येत़े नदीवर होणा:या या पूजनात तापीला सप्तश्रृंगार अर्पण करण्यात येऊन विधीवत आरतीपूजन करण्यात येत़े यावेळी काठावर  असंख्य महिला उपस्थित राहून  उपवास सोडवतात़ भाविकांसाठी विशेष पर्वणी असलेल्या या जन्मोत्सवानिमित्त जोडप्यांच्या हस्ते पूजन, अन्नदान यासह होमहवनही करण्यात येत़े नवस फेडणारे याठिकाणी हजेरी लावतात़ प्रकाशा येथील रहिवासी असलेल्या हिराबाई बन्सी पाटील यांच्याकडून अनेक वर्षापासून तापी पूजन करुन महात्म्य वाचले जात़े सालाबादाप्रमाणे तापी नदीत स्नान करुन जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी यंदाही शेकडो भाविक येणार असल्याने त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आह़े 8 जुलै रोजी  संगमेश्वर मंदिराकडून उत्सवाला प्रारंभ होणार आह़े सकाळी आठ वाजता तोताराम मंदिरावरुन वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आह़े या  शोभायात्रेत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहे. याठिकाणी आरती पूजन करण्यात आल्यानंतर तापी मातेला साडीचोळी अर्पण करण्याच्या विधीस प्रारंभ होणार  आह़े 

जन्मोत्सवामुळे केदारेश्वर मंदिर परिसराला यात्रोत्सवाचे स्वरुप येत़े येथे असलेली तापी नदीची मूर्ती अन्य कोठेही नसल्याचे सांगण्यात येत़े चार भुजा, डोक्यावर मुकूट, एका हातात शंकराची पिंड, दुस:या हातात डमरु अशी ही मूर्ती पूर्वाभिुमख आह़े तापी नदीवरील सारंगखेडा ता़ शहादा येथील बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्याने येथील पात्रात जलस्तर वाढले आह़े यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आह़े