लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर मिठ्याफळीजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी व मुलगी जखमी झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती़ तिघांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वेरी ता़ अक्कलकुवा येथील देवजी रेवला वसावे हे पत्नी हुनारीबाई व मुलगी सुमित्राबाई वसावे यांच्यासोबत दुचाकीने अक्कलकुवा येथे जात असताना मागून येणाऱ्या एमएच ४० बीएल २८७२ या ट्रकने दुचाकीला धडक दिली यात देवजी वसावे, हुनारीबाई व सुमित्राबाई हे जखमी झाले़ याबाबत देवजी वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शेख हबीब शेख गुलाब नबीब रा़ नागपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल केले़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}