शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या वसतीगृहातून ५० हजाराचे विजेचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतीगृहातून ५० हजार रुपयांचे वीजेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतीगृहातून ५० हजार रुपयांचे वीजेचे साहित्य चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे़ गणेश बुधावल ता़ तळोदा येथे हे वसतीगृह असून २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान चोरीचा हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे़गणेश बुधावल येथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे हंगामी वसतीगृह आहे़ याठिकाणी बांधकाम सुरु करण्यात आले आहे़ आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान येथील ३१ हजार ५०० रुपयांचे ६३ पंखे, ३ हजार ३०० रुपयांचे ३३ ट्यूब लाईट, ६ हजार ९०० रुपयांचे सीएफएल बल्ब, १ हजार ६५० रुपयांचे ११ स्ट्रीट लाईट, १ हजार २५० रुपयांचे फायबर बोर्ड, ५ हजार रुपयांची पाण्याची मोटार, १ हजार ३५० रुपयांचे २७ नळ असा ५० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले होते़ दरम्यान अज्ञात व्यक्तींनी चोरीसोबतच ४० हजार रुपयांचे दरवाजे तोडून नुकसानही केले होते़ ही बाब संबधित विभागाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी करण्यात आली होती़ परंतू योग्य ती माहिती न मिळाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले़यानुसार विशाल पुरुषोत्तम पाटील रा़ शहादा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़ याप्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़केंद्र शासनाने जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला दिलेल्या विशेष निधींतर्गत २०१८ मध्ये गणेश बुधावल येथील हे वसतीगृह बांधून पूर्ण करण्यात आले आहे़ वसतीगृहात यंदाच्या वर्षापासून मुलींना प्रवेश अपेक्षित होता़ परंतू तशी कोणतीही कारवाई झालेली नाही़ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चोरी झाल्याचे संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे़ आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या चोरीप्रकरणी थेट जानेवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ सध्या वसतीगृहात कोणीही कर्मचारी किंवा विद्यार्थिनी नसल्याने कोट्यावधी रुपयांचे हे बांधकाम ओस पडून असल्याने लुटालुट सुरु आहे़