लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कहाटूळ चौफुली येथील दुकानातून चोरटय़ांनी साडेचार हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कहाटूळ चौफुली येथे यशवंत सुभाष कलाल, रा.मोहिदा यांचे दुकान आहे. या दुकानाचा मागील भागाचा पत्रा उचकवून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील पंखा, गॅससिलिंडर, इन्व्हर्टर आदी साडेचार हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. सकाळी यशवंत कलाल दुकानात आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहादा पोलिसात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.
कहाटूळ चौफुलीवरील दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:36 IST