शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणपुरी परिसरात पीकांच्या नुकसानीसह शेती साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतीपयोगी वस्तूंची चोरी करण्यासह नासधुम करण्याचे सत्र सुरूच ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतीपयोगी वस्तूंची चोरी करण्यासह नासधुम करण्याचे सत्र सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ब्राह्मणपुरी परिसरात काही शेतामध्ये बºयाच शेतकऱ्यांनी टरबूज, डांगर आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. या फळांना वाचविण्यासाठी शेतकºयांनी दुष्काळात हजारो रूपये पाण्यावर खर्च केले व दुष्काळाशी दोन हात केले. परंतु आता कोरोनासमोर शेतकरी हतबल झाला असून, या फळांना खरेदीदार उपलब्ध नसल्यामुळे फळे झाडालाच सडत आहेत.शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याच बरोबर केळी, पपई पिकाला घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याने माल शेतातच पडून आहे. त्यातच शेतीउपयोगी वस्तूची नासधुम, फ्यूज पेट्या, वीज मोटार, केबल चोरीचे सत्र सुरूच असल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी सुभाष छगन मराठे यांनी ब्राह्मणपुरी शिवारातील आपल्या शेतात गंगाफळ या पिकाची लागवड केली होती तेथे पिकांना पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क आपल्या फ्यूज पेटीतील कट आऊट व मोटारीची केबल चोरीला गेल्याचे दिसून आले. फ्यूज पेटी, कट आऊटसह केबल चोरीस गेल्यामुळे पिकांना फटका बसला असून, मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. तरी संबंधित भुरट्या चोरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी, मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.