शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात दूरसंचारची मोबाईल सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिकांना सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा शुक्रवार दुपारपासून बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिकांना सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा शुक्रवार दुपारपासून बंद आह़े दूरसंचार विभागाने टावरसाठी घेतलेल्या वीजेचे बिल न दिल्याने कंपनीने वीज कनेक्शन कापल्याने ही स्थिती उद्भवली आह़े दूरसंचार विभागाकडे वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकीत होत़े त्यांच्याकडून विभागाला नोटीसा देण्यात आल्या होत्या़ कंपनी आणि दूरसंचार विभाग यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुदतवाढ देऊन निपटारा केला गेला होता़ परंतू मुदतवाढ देऊनही दूरसंचार विभागाने तालुक्यात उभारलेल्या आठ टावरचे विजबिल न भरल्याने शुक्रवारी वीज कनेक्शन कापण्यात आल़े यामुळे टावर बंद पडून साधारण 60 हजार नागरिकांची मोबाईल सेवा आणि विविध बँका, मिनी बँका व शासकीय कार्यालयातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद होऊन व्यवहार ठप्प झाल़े याबाबत ग्राहकांना अधिकृत माहिती नसल्याने त्यांच्याकडून शासकीय कार्यालयात चौकशा सुरु होत्या़ परंतू दूरसंचारची वीज कापली गेल्याची माहिती मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली़ दूरसंचार बंद झाल्याने धडगाव आणि तोरणमाळ येथील सर्वच व्यवहार बंद झाले होत़े धडगाव येथील स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँक आणि मिनीबँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती़ सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसाठी नागरिकांची फिरफिर होत होती़ वीज कनेक्शन कापलेल्या दूरसंचार विभागाच्या मोबाईल टावरचे सहा महिन्यांपासून वीज बिल भरण्यात आलेले नसल्याची माहिती समोर येत आह़े सोमवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आह़े 

धडगाव कार्यालयाचे तीन लाख रुपये विजबिल थकले दूरसंचार विभागाच्या धडगाव येथील मुख्य कार्यालयाचे वीज बिल हे तीन लाख रुपये असल्याने वीज जोडणी कापण्यात आल्याची माहिती आह़े दुसरीकडे तोरणमाळ येथील टावरचे 15 हजार 20, घाटली 7 हजार, कात्री 30 हजार 40, सुरवाणी 15 हजार 300, सिसा 20 हजार 556 तर खुंटामोडी येथील दूरसंचार विभागाच्या टावरचे वीजबिल 24 हजार 70 रुपये होत़े हे बिल न भरले गेल्याने त्यांचा वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई शुक्रवारी दिवसभरात पूर्ण करण्यात आली़ शनिवारी या भागात अनेकांचे मोबाईल बंद होत़े