शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरींग उत्तीर्ण मुलाच्या नोकरीसाठी 15 लाख आणावेत म्हणून सुनेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माहेर आणि जळगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये आणावेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील माहेर आणि जळगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आला़ जानेवारी 2016 पासून हा प्रकार सुरु होता़ छळाला कंटाळून विवाहितेने अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ फिर्यादीनुसार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा वसीम शेख हकीम खाटीक रा़ वीर सावरकर नगर, पिंप्राळा, जळगाव याच्यासोबत मध्ये झाला होता़ विवाहानंतर पती वसीमसह सासरे शेख हकीम शेचा हमी खाटीक, सासू नजमा खाटीक आणि नणंद नाजिमा यांनी किरकोळ कारणांवरुन छळ करण्यास सुरुवात केली होती़ दरम्यान विवाहितेने मुलीला जन्म दिला होता़ यावेळीही सासरच्यांनी ‘मुलगा हवा मुलगी नको’ असे बोलून हिणवत वेळोवेळी मानसिक त्रास दिला होता़ 2016 मध्ये पती वसीम याने इंजिनिअरींगची परीक्षा पास केल्यानंतर नोकरी लावण्यासाठी विवाहितेने नंदुरबार येथील माहेरुन 15 लाख रुपये आणावेत म्हणून मानसिक त्रास देत छळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ यातून माहेरी आलेल्या विवाहितेने  शहर पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक येलवे करत आहेत़

हाटमोहिदे येथील विवाहितेचा छळ नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदे येथील माहेर तर अंकलेश्वर (गुजरात) येथील सासर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी दुकान वाढवण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला़ मार्च 2017 ते मे 2019 दरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप युवराज झाल्टे, युवराज रुपचंद झाल्टे, पुष्पाबाई युवराज झाल्टे, जयश्री मुकेश पवार, दिपीका कैलास झाल्टे, दिपक युवराज झाल्टे, योगिता दिपक झाल्टे, प्रदीप युवराज झाल्टे सर्व रा़ राजपिपला रोड अंकलेश्वर जि़ भरुच यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े