शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजाराने ग्रस्त दाम्पत्याने मागितली आत्महत्येची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला़ यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी त्यांना ताब्यात समज देण्याचा प्रयत्न केला़   शहादा तालुक्यातील मंदाणे  येथील पारुबाई मोतीलाल जाधव व मोतीलाल रामा जाधव हे दोघेही दुर्धर आजाराने पिडित आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पाच वर्षापासून उपचार सुरु आहेत़ यातून दोघांकडून कोणत्याही प्रकारे काम होत नाही़  दरम्यान दोघांनी त्यांच्या विविध समस्यांचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी यांना दिले होत़े निवेदनात, मोतीलाल जाधव यांची सिलींगपूर ता़ तळोदा येथे वडीलोपाजिर्त शेती असून त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मकराम सोमा राठोड याने ही जमिन बळकावली आह़े याबाबत जाब विचारल्यावर राठोड याने जाधव कुटूंबावर प्राणघातक हल्लाही केला होता़ याबाबत असलोद औटपोस्टवर सातत्याने तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने 9 वर्षीय मुलासह आत्मदहनाचा इशारा दोघांनी दिला होता़ दरम्यान शुक्रवारी सकाळी हे दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता, शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले होत़े त्याठिकाणी त्यांचे समुपदेशन करण्यात आल़े उशिरार्पयत पोलीस प्रशासन दोघांची चौकशी करत होत़े जाधव पतीपत्नीसह त्यांचा 9 वर्षाचा मुलगा शिवा यालाही दुर्धर आजार आह़े बळकावलेली जमिन परत मिळावी म्हणून दोघांनी मुलासह आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आह़े