शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रोझवा पुनर्वसन क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा वाल लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील प्रकल्पबाधित उदेसिंग लिवा पावरा याने आपल्या चार एकर क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील प्रकल्पबाधित उदेसिंग लिवा पावरा याने आपल्या चार एकर क्षेत्रात पापडी वालची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. बहुधा तळोदा तालुक्यातून शेंगवर्गीय पापडी वाल पिकाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, ह्या बाधिताने आपले वडील लिवा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पाण्याच्या उत्तम निचरा होणाऱ्या शेत जमिनीत ठिबकच्या साहाय्याने मल्चिंग पेपरवर वालची बीची लागवड केली. पापडी वालचे वेळोवेळी देखरेख करून या पिकावर भुरी रोगासारखा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी खबरदारी घेत कीटक नाशकाचीही फवारणी करून त्यानंतर आंतर पीक म्हणून गवारची लागवड केली आहे. त्यामुळे पापडी वालचे उत्पन्न घेतल्यानंतर लगेच गवार काठणीस सुरुवात होण्यास मदत होणार आहे.अद्यापपोवेतो वाल हे सातपुडा परिसरात ग्रामीण भागात घराच्या अवती भोवती, शेतबांधावर, परस बागांमध्येच लावलेले दिसत होते. परंतु प्रथमच हे शेंगवर्गीय पिकाची लागवड बाधिताने करून उत्पन्न घेतल्याने उत्पादनातून अर्थाजनासोबतच जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होणार असून, त्याबरोबरच पिकांची फेर पालट होण्यासाठीही हे पीक महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या पापडी वाल बाजारपेठेत ३० ते ३५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात येत असून, थंडीत खवैय्यांकडून वालला वाढती मागणी आहे. ह्या शेंगाची पाच ते सात दिवसांनंतर तोडणी करण्यात येत आहे.

कमी खर्चात वालचे उत्पादनवालचे बियाणे स्वस्त मिळत असून, लागवड केल्यानंतर दोन - अडीच महिन्यात तोडणी सुरू होत असते. तसेच या पिकाला सिंचनाचीही जास्त गरज नसून, रासायनिक खतांचीही आवश्यकता भासत नसून, ढगाळ हवामान असल्यास फवारणी करावी लागते. त्यामुळे इतर पिकांपेक्षा पापडी वालच्या उत्पादनास कमी खर्च लागत असल्याचे उदेसिंग पावरा यांनी सांगितले.