शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमरस-पुरीच्या पाहुणचाराने विद्यार्थी तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:25 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील केंद्रशाळेत दर शनिवारी विद्याथ्र्याना रुचकर भोजन देण्यात येते. आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभात तयार विद्याथ्र्याना मध्यान्ह भोजन देण्यात येते. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे.विद्याथ्र्यानी शाळेत नियमित यावे, पटसंख्या वाढावी,  शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षक विविध प्रय} करताना दिसून येतात. असाच प्रयोग येथील मुलांच्या जि.प. शाळेत सुरू आहे. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत महिन्यातून किमान चार दिवस विद्याथ्र्याना पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार दिला जावा, अशी तरतूद आहे. विद्याथ्र्याना पूरक आहार मिळावा यासाठी येथील शिक्षकांनी वेगळीच शक्कल लढवून दर शनिवारी आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचा पाहुणचार विद्याथ्र्याना दिला जात आहे.  इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा पालकांचा कल जास्त दिसून येतो. त्यामुळे जि.प. शाळांकडे मुलांची संख्या कमी होताना दिसते. मात्र जि.प. शाळेतील शिक्षकही शिकविण्यासोबतच अन्न शिजविण्याच्यार्पयत  जातीने लक्ष देऊन विद्याथ्र्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. शिक्षणासोबतच शालेय पोषण आहारात जर बदल केला तर नक्कीच शालेय पटसंख्येत वाढ होईल, असे त्यांना वाटते आणि ते खरेही ठरत आहे. शनिवार म्हटला की विद्याथ्र्याची उपस्थिती घटते. त्यामुळे शनिवारी विद्याथ्र्याना पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक रामलाल परधी यांनी विद्याथ्र्याना चक्क आमरसाची मेजवानी दिली. त्यासोबत रशी-भातचे जेवणही दिले. शिक्षक दर्पण भामरे यांनी स्वत: बाजारात जाऊन आंबे आणले. शिक्षिका संगीता राणे, अनिता पाटील यांनी पोषण आहार शिजविणा:या महिलांच्या सहकार्याने शाळेतच आंब्याचा रस तयार केला. या पाहुणचारामुळे विद्यार्थीही खूष झाले. शनिवारीही विद्याथ्र्याना आमरससोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचे जेवण देण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख एन.आर. निकुंभ उपस्थित होते. शाळेत शनिवारी राजगिराचे लाडू, बिस्किट, अंडी, सफरचंद, शेंगदाणे, चिक्की, शिरा आणि आता चक्क आमरस यामुळे विद्याथ्र्यामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होत असून विद्याथ्र्यानाही पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार मिळत आहे.