शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे व त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी सुरवाणी येथे विज्ञान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे व त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी सुरवाणी येथे विज्ञान प्रदर्शन भरविले. यात एकुण ४७ उपकरणे मांडण्यात आली असून बहुतांश उपकरणे ही पर्यावरणपूरक होती. यावरुन या विद्यार्थ्यांनी संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न केला.धडगाव पंचाायत समिती व तालुका मुख्याध्यापक संघामार्फत हे प्रदर्शन भरविण्यात आले. या यावेळी गटशिक्षणाधिकारी जे.ए. चौरे, मुख्याध्यापक एन. जे.गोस्वामी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष के.जी.पाठक, प्रविण बोरसे, बी.के.महिरे, नगिन पाटील, उमा पाडवी, श्रीमती पानपाटील, डी.बी.तडवी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात ४७ विद्यार्थ्यांकडून उपकरणे मांडण्यात आली होती. त्यातून पहिली ते पाचवीच्या गटात प्रथम हर्षदा पावरा व सानिया मनियार, द्वितीय अजिंक्य वळवी व योगेश पावरा, तृतीय कलेश्वरी पाडवी व शुभांगी तडवी, उत्तेजनार्थ म्हणून ललिता वळवी व बिसा वळवी यांना बक्षिस देण्यात आले.सहावी ते आठवीच्या गटात प्रथम मनिषा पावार, प्रमिला पावरा, मोगी पावरा व प्रतिक्षा पावरा यांच्या ज्वालामुखीचा उद्रेक या उपकणाला देण्यात आले. द्वितीय ऋषाली शिवदे व प्रिती शिंपी, तृतीय रमिला वळवी व अर्चना तडवी तर उत्तेजनार्थ म्हणून कृतिका जाधव व अविष्कार बनसोडे यांना बक्षीस देण्यात आले.नववी ते १२ वीच्या गटात प्रथम राहुल पावरा व स्वप्निल परमार, द्वितीय हर्षल पावरा, धुरसिंग वळवी व रवींद्र पावरा, तृतीय रवींद्र पावरा तर उत्तेजनार्थ म्हणून कांतिलाल पावार व कांतिलाल तडवी यांना बक्षिस देण्यात आले. आदिवासी राखीवच्या प्राथमिक गटात मंगला नाईक व बेबी वळवी तर माध्यमिक गटातून आंबिलाल पावरा व मगन वळवी यांना प्रथम बक्षिस देण्यात आले.शिक्षक गटातून केशव पावरा यांना प्रथम तर द्वितीय बक्षिस संदीप रोकडे यांना देण्यात आले. लोकसंख्या शिक्षणात भरतसिंग पवार यांच्या ‘व्यसनांचा विळखा-मृत्यूवाचून नाही सुटका’ या व्यसनमुक्तीतून सुटकेसाठी योगदान देणाऱ्या प्रकल्पाला देण्यात आले.