शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 39 महाविद्यालयांमध्ये रंगणार विद्यार्थी परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाने महाविद्यालयीन निवडणूकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा ‘राजकारण’ रंगणार आह़े या निवडणूकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाने महाविद्यालयीन निवडणूकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा ‘राजकारण’ रंगणार आह़े या निवडणूकांचा निवड कार्यक्रम जाहिर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील 39 नियमित महाविद्यालयातील 18 हजार युवक-युवती विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष निवड करणार आहेत़ विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने बुधवारी विद्यार्थी परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े यानुसार 23 ऑगस्ट रोजी महाविद्यालयांनी निवडणूक अधिसूचना आणि त्यासोबत नमुने प्रसिद्ध करावयाचे आहेत़ 24 ऑगस्ट रोजी मागासवर्ग प्रतिनिधी आरक्षण सोडत घेणे, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी जाहिर करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत़  यादीवर विद्याथ्र्याना 26 ऑगस्टर्पयत आक्षेप नोंदवता येणार आह़े 27 ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिका:यांची यादी घोषित करणे आणि 29 रोजी सकाळी 11 ते 5 या दरम्यान विद्याथ्र्याना नामनिर्देशन दाखल करता येणार आह़े अवघ्या 10 दिवसांच्या या कार्यक्रमात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दाखल अर्जाची छाननी होणार आह़े अर्ज अवैध ठरल्यास 3 सप्टेंबर रोजी विद्यार्थी उमेदवार हरकत दाखल करु शकतील व 4 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आह़े यातून त्याच दिवशी सायंकाळी अंतिम नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करुन माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल़ यानंतर एक दिवस प्रचारासाठी देत 7 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आह़े चार तासांर्पयतच चालणा:या या मतदान प्रक्रियेनंतर त्याच दिवशी निकालही जाहिर केले जाणार आहेत़ विद्यापीठाने अत्यंत ‘एक्सप्रेस’ निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याने इच्छुकांची धावपळ होणार आह़े विद्यार्थी दशेत नेतृत्व गुण असलेल्या अनेकांच्या इच्छांना या निवडणूकीमुळे घुमारे फुटणार असून ही प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी महाविद्यालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आह़े 

पक्ष विरहित असलेल्या या निवडणूकीत चिन्हाबाबत माहिती देण्यात आलेली नाही़ दरम्यान ही निवडणूक पार पडल्यावर ‘लोकशाही’ पद्धतीनेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूकही होणार आह़े 9 सप्टेंबर रोजी विद्यापीठ अधीसूचना काढून कार्यक्रमास प्रारंभ करेल, महाविद्यालयात निवडून आलेले प्रतिनिधी 23 सप्टेंबर रोजी विद्यापीठ परिषदेसाठी मतदान करणार आहेत़