शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात स्ट्रॉबेरीची शेती फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. येथील हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धीरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे. धीरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे. त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली. डाब येथे २००७ पासून स्ट्रॉबेरीची लागवड होत आहे. मात्र, शेतकरी पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेतीसहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत आपल्याकडील वडिलोपार्जित जमिनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली. पूर्वी वडिलांच्या नावावरील दोन एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या चार एकर जमिनीवर गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असे. त्याजागी धीरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरभरा आणि भगर लागवडदेखील केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. त्यांनी नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनसाठी खर्च केला. शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केल्यान त्यांना फायदा झाला.

मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी प्रयत्न धीरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची          लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. शेतीतील नवे तंत्र आणि सोबतीला असलेली प्रयोगशीलता यामुळे दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात यश मिळविले आहे. आता त्यांना वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचावयाचे.

गेल्यावर्षी दोन लाखांचे उत्पन्न मिळाले तर यावर्षी तीन लाखांपर्यंत उत्पन्न येईल. साधारण ८० ते १२० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडीग करून मोठ्या शहरांत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शेतीत नवे तंत्र वापरले त्याचा लाभ निश्चित होतो.-धीरसिंग पाडवी, शेतकरी, डाब, ता.अक्कलकुवा.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील २५ शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. साधारणत १० ते १२ एकरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. एक एकरवर ३० क्विंटल होणारे उत्पादन ४० क्विंटलपर्यंत व्हावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.-अविनाश खैरनार, मंडळ कृषी अधिकारी.